मुंबई

Malegaon Blast: फरार रामचंद्र कालसंग्राची मालमत्ता जप्त करा; विशेष एनआयए न्यायालयाचे आदेश!

फरारी आरोपीची संपत्ती जप्ती: विशेष NIA न्यायालयाचा आदेश | Asset seizure of fugitive accused: Special NIA court orders

सकाळ वृत्तसेवा

Malegaon Blast : मालेगाव येथील २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी रामचंद्र कालसंग्राची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश विशेष एनआयए न्यायालयाने (ता.९) दिले. मध्य प्रदेशातील शहजानपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यास न्यायालयाने सांगितले आहे.

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव येथे मशिदीजवळ बाॅम्बस्फोट झाला होता. त्यात सहा लोकांचा मृत्यू, तर १०० हून अधिक जण जखमी झाले. भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यासह एकूण १३ आरोपी असून त्यातील ५ आरोपींची सुटका झाली आहे, तर रामचंद्र गोपालसिंग कालसंग्रा उर्फ रामजी उर्फ ओमजी उर्फ पटेल आणि संदीप डांगे हे दोघे फरार आहेत.

कालसंग्राविरुद्ध विविध बॉम्बस्फोट प्रकरणांत गुन्हे दाखल आहेत. समझोता एक्स्प्रेसमधील बॉम्बस्फोट, २००६ मधील मालेगाव बॉम्बस्फोट आणि २००७ मधील हैदराबादच्या मक्का मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटात कालसंग्राचा सहभाग होता, असा आरोप आहे. न्यायालयाने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही बजावली आहे. वाॅरंट तसेच फरार घोषित केल्यानंतरही कालसंग्रा न्यायालयात हजर राहिला नाही. या पार्श्वभूमीवर विशेष एनआयए न्यायालयाचे न्या. ए. के. लाहोटी यांनी कालसंग्राची मालमत्ता जप्त करण्यास मुभा दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT