sachin-vaze-arrested
sachin-vaze-arrested 
मुंबई

सचिन वाझे प्रकरणात NIAची मोठी कारवाई

सकाळ डिजिटल टीम

सध्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या सचिन वाझे प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणेने मोठी कारवाई केली आहे. सचिन वाझे यांच्या मुंबईच्या CIUच्या ऑफिसमधून NIAने लॅपटॉप, मोबाईल फोन्स आणि काही कागदपत्रे हस्तगत केल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने मुंबई पोलीसांच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. एनआयएने काल रात्री उशिरा ही कारवाई केली. तसेच, या प्रकरणात सीआययुच्या ५ अधिकाऱ्यांचा आणि क्राईम ब्रँचच्या दोन अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवण्यात आला. अंबानी यांच्या घराजवळ आढळलेली स्कॉर्पियो कार ही चोरीची नसून ती कार सचिन वाझे राहत असलेल्या सोसायटीतच पार्क करण्यात आली असल्याची माहिती एएनआयच्या तपासात उघड झाली होती. त्यानंतर एनआयएने ही महत्त्वपूर्ण कारवाई केली.

अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्कॉर्पियो कारप्रकरणी तपास करताना ठाण्यातील दुकानदाराची डायरी, रेकॉर्ड्स, सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले होते. त्या वस्तू गुन्हे शाखेच्या रेकॉर्डवर नसल्याची खळबळजनक माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे तपासाच्या नावाखाली वाझे यांनी पुरावे नष्ट केले का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळेच एनआयने वाझे यांच्या मुंबईतील ऑफिसची झाडाझडती घेतली आणि त्यांच्या ऑफिसमधून लॅपटॉप, मोबाईल फोन्स आणि काही कागदपत्रे हस्तगत केली.

या प्रकरणात एनआयएने केलेल्या तपासात आणखी एक बाब उघड झाली. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सचिन वाझे यांनी अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली ती स्कॉर्पियो प्लांट करण्याच्या कटात सहभाग असल्याचं मान्य केल्याचं सांगितलं. हिरेन यांनी चौकशीदरम्यान ती स्कॉर्पियो कार १७ फेब्रुवारीला मुलुंड-ऐरोली रोडवरून चोरी झाल्याची माहिती दिली होती. NIA ने केलेल्या तपासात असं दिसून आलं की ती स्कॉर्पियो कार कोणीतरी चावीने उघडली, स्वत: चालवून आणली आणि वाझे राहत असलेल्या ठाण्याच्या साकेत सोसायटीमध्ये पार्क केली. त्यानंतर हीच स्कॉर्पियो कार मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसहित आढळली. पण मुंबई पोलीसांनी केलेल्या तपासात मूळ पुराव्यांमध्ये असल्याने वाझेंच्या ऑफिसची झाडाझडती घेण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT