मुंबई

Sachin Waze: पुरावे नष्ट करण्याच्या नादात अडकले सचिन वाझे?

पूजा विचारे

मुंबई: सचिन वाझे प्रकरणात ठोस पुरावे असल्याचा दावा NIA करत असल्याचं कळतंय. कारण NIA या संपूर्ण प्रकरणात वाझेंनी पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने अनेक गोष्टी केल्या आहेत, असं एनआयएचं म्हणणं आहे.

एनआयएनं सांगितलं की,  आपल्या अधिकाराचा वापर करून रियाज काझी कडून बनावट नंबर प्लेट बनवून घेणे, संबधित दुकानातून CPU, CCTV जप्त करणं त्याच बरोबर राहत्या सोसायटीत म्हणजेच साकेत मधील CCTV फूटेजसाठी काठीच्या स्वाक्षरी पत्राचा वापर केला.

ताब्यात घेतलेल्या पुराव्यांची नोंद ही रेकॉर्डवर न आल्याचे तपास अधिकारी  यांच्या चौकशीत समोर आले होते. त्यामुळे तपास अधिकारी ACP नितीन अलकनुरे हे देखील मुख्य साक्षीदार बनू शकतात, असंही एनआयएनं म्हटलं आहे. तर वाझेंची चालक याचीही NIA ने चौकशी केली होती. हे तिघे सीआरपीसी १६४ अंतर्गत या प्रकरणात साक्षीदारांचे होऊ शकतात, असंही एनआयए सांगतेय.

सचिन वाझेंच्या ५ गाड्या आतापर्यंत NIA कडून जप्त

या प्रकरणात आतापर्यंत तब्बल 5 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. NIA ने स्कॉर्पिओ, इनोव्हा, प्रॅडो आणि एक मर्सिडीज गाडी जप्त केली आहे. गुरुवारी दुपारी दुसरी मर्सिडीज जप्त करून ती कार्यालयात आणली. पहिली मर्सिडीज सीएसएमटीजवळील एका पार्किंगमधून ताब्यात घेण्यात आली होती, त्यानंतर आणखी एक मर्सिडीज एनआयएनं शोधून काढली.  पहिल्या मर्सिडीजमध्ये केरोसीन, 5 लाखांची रोख, पैसे मोजण्याचं मशिन, शर्ट सापडले होते.

NIA says Sachin Waze has done many things destroy evidence

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'उंडवडी सुपे येथील अपघातात दाेनजण जागीच ठार'; कार व दुचाकीचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT