मुंबई

....आणि मृत दशरथ ऊर्फ दसमा बाबू वाघमारे यांच्या पत्नी असा उल्लेख होताच त्यांचा बांध फुटला !

सकाळवृत्तसेवा

अलिबाग : जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी भरलेल्या सभागृहात मृत दशरथ ऊर्फ दसमा बाबू वाघमारे यांच्या पत्नी असा उल्लेख होताच त्या 50 वर्षीय महिलेला आसू आवरले नाहीत. आपला पस्तीस वर्षाचा संसार गुण्यागोविंदाने सांभाळणाऱ्या अलिबाग तालुक्यातील उमठे-बंगलेवाडी येथील जानकी दशरथ वाघमारे या आदिवासी महिलेला निसर्ग चक्रीवादळाने विधवा केले, याचे डोक्यावरचे ढीगभर दुःख पदराला बांधून ही महिला शुक्रवारी (ता. 5) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चार लाखांचा धनादेश स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आली होती.

आदिवासी वाडीत राहणाऱ्या या महिलेने जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुख्यमंत्र्यांचा थाटमाट पहिल्यांदाच पाहिला. हातातला पदर पुढे करीत ती मुख्यमंत्र्यांसमोर उभी होती. तिला आधार देण्यासाठी तिचा दीर सोबत होता. मृत दसमा आणि दशमी यांच्यात चक्रीवादळाने कायमची ताटातूट केली. 33 वर्षीय मुलगी वनिता विलास वाघमारे ही लग्न होऊन सासरी नांदत असल्याने दशमीचा आता म्हातारपणी सांभाळ करणारा नातेवाईक नाही. 58 वर्षीय दशमा आणि दशमी एकमेकांना आधार देत सुखाने संसार करीत होते; परंतु 'तो' दिवस दसमा वाघमारे यांचा अखेरचा ठरला.

निसर्ग चक्रीवादळ संपूर्ण अलिबाग तालुक्यात घोंगावत असताना हे दोघेही एकमेकांना मानसिक आधार देत घरात सुखरूप होते. दुपारी दीड वाजता वादळाचा जोर कमी होत असे वाटल्याने दसमा वाघमारे घराबाहेर पडले.

याच वेळेस झाडांना मुरगटवीत जोराचा वारा आला. या वाऱ्याने विजेची डीपी अंगावर पडल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. बोरघर तलाठी तेजस्विनी काळे यांनी पंचनामा उरकून सोपस्कार पूर्ण केले. निसर्ग चक्रीवादळातील पहिल्या बळीची बातमी संपूर्ण महाराष्ट्रात झळकली. या घटनेस जेमतेम तीन दिवस होत असताना मानसिक आधार हरपलेली ही विधवा महिला मुख्यमंत्र्यांसमोर उभी होती.

प्रशासनाने तत्परता दाखवत तिला ही तत्काळ मदत दिली; पण या मदतीबद्दल आभार व्यक्त करण्यासाठीही तिच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हते. तिच्या चेहऱ्यावर म्हातारपणीचा आधार गमावल्याच्या भावना स्पष्ट दिसत होत्या आणि आपला 35 वर्षांच्या सुखी संसाराचा साथीदार गमावल्याच्या दुःखाने आसू आवरले नाहीत.

nisarga cyclone stories when her when her name was called as wife of late dashrath she was shattered

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Train Food : ‘वंदे भारत रेल्वे’त प्रवाशांना आता स्थानिक पदार्थ दिले जाणार ; रेल्वेमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Messi and Revanth Reddy Football Video : लिओनेल मेस्सीने हैदराबादेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डींसोबत खेळला फुटबॉल; हजारो चाहत्यांचा उत्साह शिगेला!

PMC Retired Employees : निवृत्तीनंतर दिलासा; २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा मोफत वैद्यकीय उपचार!

Pune Health : कर्करोग निदानासाठी पुणेकरांना मोठा दिलासा; महापालिकेचे पेट स्कॅन सेंटर सुरू; खासगी रुग्णालयांपेक्षा निम्म्या खर्चात!

Soybean MSP : आधारभूत किमत खरेदीत शेतकऱ्यांवर अन्याय नको; आमदार डॉ. संजय कुटे यांनी अधिवेशनात मांडली ठाम भूमिका!

SCROLL FOR NEXT