Nitin Gadkari Reached Dombivli half an hour Lok Sabha Speaker Sumitra Mahajan thanked Gadkari mumbai sakal
मुंबई

Sumitra Mahajan : अर्ध्या तासात डोंबिवलीत आले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार

लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी मानले गडकरींचे आभार

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोंबिवली मध्ये यायच म्हटलं की रस्त्यांमुळे लोक डोंबिवली नको अशी प्रतिक्रिया पहिले द्यायचे. मात्र आता डोंबिवलीतील रस्ते पाहता मी अर्ध्या तासात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले पाहिजे असे माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी मंत्री गडकरी यांचे डोंबिवलीत आभार मानले.

डोंबिवलीतील सावळाराम म्हात्रे क्रीडासंकुल मध्ये पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी या सोहळ्यात लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

डोंबिवलीतील रस्ते म्हटले की त्यांची दुरवस्था आणि वाहतूक कोंडी याची सर्वांना भीती वाटते. या रस्त्यावरून अनेक राजकारण्यांनी देखील ताशेरे ओढले आहेत. डोंबिवली रस्त्यांचे आता मात्र कौतुक होत असल्याचे डोंबिवलीतील कार्यक्रमात पहायला मिळाले. लोकसभा अध्यक्षा महाजन यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांचे आभार मानत रस्त्यांच्या कामाचे कौतुक केले.

त्या म्हणाल्या, अगोदर डोंबिवली मध्ये यायच म्हटलं की रस्त्यावरून येताना दीड तास लागायचे. आता येताना अर्धा तास लागतो. यामुळे मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानते. पुस्तकांचा कार्यक्रम असल्याने मी आज येथे आल्याचे त्यांनी सांगितले.

कॉग्रेस नेते राहुल गांधी हे भारत जोडो यात्रे निमित्त संपूर्ण देशात पायी फिरत आहे यावर महाजन म्हणाल्या, राहुल गांधी हे भारत बघायला निघाले हे माझ्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे. किती बघितल ते कळेलच. मला आवडलं खरंच चांगली गोष्ट आहे. त्यांना बाकीच्यांनी साथ द्यावी, त्यांच्यात चांगले बदल व्हावे अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करते. कारण प्रजातंत्र मध्ये विरोधी पक्षाचा नेता देखील स्ट्रॉंग असावा लागतो, तसेच समजदार असावा लागतो असे त्या म्हणाल्या.

तुमच्या पालकत्वाची जोरदार चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे या प्रश्नावर महाजन म्हणाल्या, पालक म्हणून कोणी कुठून आणली माहिती नाही. एवढे मोठे पद भूषविले आहे आता इच्छा नाही, तेवढी ताकद पण राहिली नाही. पण मी एकदा गम्मत केली होती. तेव्हा मी म्हटलं ठीक आहे पार्टीला सांगा त्यांनी मला महाराष्ट्राचा पालक करा. मी जाईन, जाऊ कशी तर पालक करावा मग मी जाईन. गोष्टी करीन महाराष्ट्राच्या लोकांशि पण पालक म्हणून, पद नाही.

पुष्कळ पदे झाली, पण इथे उगीच कशाला ढवळा ढवळ करू. माझा मध्य प्रदेश मला भरपूर मान देतो माझा इंदोर अजूनही माझ्याकडे विचारायला येतो. मला त्यांची कल्पना नाही ऐकली की बरं नाही वाटत.

महाराष्ट्र माझं माहेर आहे, म्हणून कधी कधी वाईट वाटत. तेव्हा मी बोलते बाबांनो मला यावं लागेल कधी तरी. पालक म्हणून तुमच्यात एकदा यावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT