coronavirus vaccine oxford serum institute adar poonawalla tweet
coronavirus vaccine oxford serum institute adar poonawalla tweet 
मुंबई

अँटिबॉडी तयार झाल्या नाहीत, आदर पूनावालाविरोधात तक्रार

दीनानाथ परब

मुंबई: कोव्हिशिल्ड लसीचा (Covishield jab) डोस घेऊनही शरीरात अँटिबॉडीज तयार झाल्या नाहीत. म्हणून लखनऊनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला (Adar Poonawalla) यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. आशियाना पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदवण्यात आलीय. डीसीजीएचे संचालक, आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल, आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गवा, राष्ट्रीय आरोग्य मिशनचे संचालक अपर्णा उपाध्याय यांची नावे तक्रारीत घेतली आहेत. (No antibodies developed despite Covishield jab Lucknow man files complaint against Adar Poonawalla)

प्रताप चंद्रा असे तक्रारदाराचे नाव आहे. आठ एप्रिलला मी कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला. २८ दिवसांनी त्यांचा दुसरा डोस होता. ज्या दिवशी दुसरा डोस होता, त्या दिवशी त्यांना लसीच्या डोसची मुदत सहा आठवड्यांनी वाढवण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर सरकारने कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर १२ आठवड्यांचे केले.

लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर मला बरं वाटत नव्हतं, असं चंद्रा यांनी सांगितलं. आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव यांच्या मीडियामधील एका वाक्याचा त्यांनी दाखल दिला. "कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर शरीरात चांगल्या अँटिबॉडीज तयार होतात" असं भार्गव यांनी म्हटलं होतं. प्रताप चंद्रा यांनी सरकारी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेमध्ये कोविड अँटीबॉडी जीटी टेस्ट करुन घेतली. या टेस्टमधुन तक्रारदाराच्या शरीरात कोविड-१९ विरोधात अँटीबॉडीज तयार झाल्या नसल्याचे दिसून आले. उलट प्लेटलेटस ३ लाखावरुन दीड लाख झाल्या.

प्लेटलेटस निम्म्याने कमी झाल्यामुळे कोरोनाची बाधा होण्याचा धोका अधिक वाढला आहे, असा चंद्रा यांचा दावा आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे. अजून एफआयआर दाखल केलेला नाही. प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलिसांनी वरिष्ठांना या प्रकरणाची कल्पना दिली आहे. तक्रारीत नाव असलेल्या लोकांविरोधात एफआयआर नोंदवला नाही, तर कोर्टात जाण्याची धमकी तक्रारदाराने दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT