Mumbai Police Crime Branch esakal
मुंबई

Mumbai Police : पोलिस भरती कंत्राटी स्वरुपाची नाही! गृहविभागातील सूत्रांची माहिती

पोलिस भरती कुठल्याही परिस्थितीत कंत्राटी स्वरुपाची होत नाही

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Police : मुंबई पोलिस दलात कंत्राटी स्वरुपाची भरती होणार असल्याचे वृत्त एका दैनिकाने प्रकाशित केले होते.मात्र हि बातमी धादांत खोटी असल्याची माहिती गृहविभागातील सूत्रांनी 'साम टीव्ही'ला दिली आहे.पोलिस भरती कुठल्याही परिस्थितीत कंत्राटी स्वरुपाची होत नाही आणि होणारही नाही, अशी माहिती गृहविभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेली आहे.

अधिक माहिती अशी कि, गेल्या काळात पोलिस भरती न झाल्याने आणि गेल्या पोलिस आयुक्तांनी सुमारे 4500 पोलिस जिल्हा बदल्यांसाठी सोडल्याने मुंबई पोलिस दलात मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली. पोलिस शिपायांची सुमारे 10 हजार पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्यास सुद्धा मंजुरी देण्यात आली असून, त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन ते मिळण्यास विलंब लागतो. अशी बातमी समोर आली होती.

त्या बातमीत असेही नमूद होते कि, पोलिस भरती करुन नियमित पोलिस सेवेत दाखल होईस्तोवर मुंबईची कायदा-सुव्यवस्था वार्‍यावर सोडू शकत नाही, त्यामुळे मुंबई पोलिस दलाने शासनाच्याच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून सुमारे 3000 मनुष्यबळ तुर्तास वापरण्याचे ठरविले. जोवर नियमित पोलिस उपलब्ध होत नाही, तोवरच या सेवा घेण्यात येणार आहेत.असे वृत्त होते. मात्र हे वृत्त खोटे असल्याचे समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT