Mumbai Police esakal
मुंबई

Mumbai Curfew : मुंबईत जमावबंदी नाही.. अफवांवर विश्वास ठेऊ नका..

काही दिवसापासून मुंबई पोलिसांनी कलम 144 जमावबंदी लागू केल्याची बातमी प्रसार माध्यमात पाहायला मिळत होती.

सकाळ वृत्तसेवा

काही दिवसापासून मुंबई पोलिसांनी कलम 144 जमावबंदी लागू केल्याची बातमी प्रसार माध्यमात पाहायला मिळत होती.

मुंबई - काही दिवसापासून मुंबई पोलिसांनी कलम 144 जमावबंदी लागू केल्याची बातमी प्रसार माध्यमात पाहायला मिळत होती. प्रसार माध्यमातील बातम्यांमुळे मुंबईत जमावबंदी लागू होणार असे वातावरण तयार झाले होते. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शनिवारी एक निवेदन जारी केले. या निवेदनात शहरात संचारबंदी लागू करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांनी शहरात संचारबंदी लागू झाल्याच्या अफवा खोट्या असल्याचे निवेदनात स्पष्ट आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

बेकायदेशीर मेळावे आणि रॅली टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी 3 ते 17 डिसेंबर दरम्यान शहरात निर्बंध लागू केले आहेत, असे पोलिसांनी आदेशात सांगितले आहे. ऑर्डर ही एक नियमित प्रक्रिया असून त्या प्रक्रियेचे दर 15 दिवसांनी पुनरावलोकन केले जाते. या मुद्द्यावर पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी एका व्हिडिओ संदेश जारी केला. या संदेशात नांगरे पाटील यांनी सांगितले की, मुंबईत कोणत्याही ठिकाणी कर्फ्यू नाही. मुंबईकरांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये जेणेकरून लोकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT