मुंबई

दिवाकर रावतेंना मातोश्रीवर 'नो एन्ट्री'

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले असून यात शिवसेनेला अपेक्षित यश मिळालं नाही.हे समजताच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर धाव घेतली.मात्र मातोश्रीच्या गेटवर पोहोचलेल्या दिवाकर रावतेंना मातोश्रीवर जाण्यास मज्जाव करून त्यांना थेट शिवसेना भवन वर जाऊन वाट पाहण्याचा सल्ला देण्यात आला.

विधानसभा निवडणुकीच्या निकालाच चित्र स्पष्ट झालं असून यात मुख्यमंत्रीपदावर दावा करणाऱ्या शिवसेनेला अपेक्षित आकडा गाठता आलेला नाही.या निकालावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते देखील लक्ष ठेऊन होते. सकाळपासूनच निकालावर लक्ष ठेऊन असलेल्या दिवाकर रावतेंना शिवसेनेची पडझड दिसताच ते ताबडतोब उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीकडे निघाले,मात्र मातोश्रीच्या गेटवर पोहोचताच रावतेंना मातोश्रीच्या गेटवरच अडवण्यात आलं.त्यांनी आपल्याला उद्धव ठाकरेंना भेटायचं असल्याचं वारंवार सांगितलं मात्र 'साहेबांनी आपल्याला भेटायला नकार दिला असून,साहेब आपल्याला शिवसेना भवन येथे भेटतील' असा निरोप देण्यात आला.यामुळे रावतेंना शिवसेना भवनवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ताटकळत बसावे लागले.

विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले असून भाजप-शिवसेना महायुतीच्या बहुमताच्या जवळपास पोहोचली आहे.अस असलं तरी महायुतीमधील बऱ्याच जागांची पडझड झाली असून ती रोखण्यात भाजपसह शिवसेनेला ही अपयश आलं आहे.या निवडणुकीत शिवसेनेला ही मोठा फटका बसला असून त्यांना आपली जुनी संख्या ही राखता आली नाही.यामुळे शिवसेना आणि शिवसेना नेत्यांमध्ये नैराश्य पसरलं आहे.हे नैराश्य झटकत आपल्या नेत्याला धीर देण्यासाठी पोहोचलेल्या दिवाकर रावतेंना 'मातोश्री' बाहेरच का अडवण्यात आलं याचीच चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

पोयरी हलु हलु नाच… ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर viral video

Latest Marathi Live Update: विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू

Latur Police Bharti: लातूरमध्ये पोलिस शिपाई भरतीची आज लेखी परीक्षा; ३२८ उमेदवार सज्ज

SCROLL FOR NEXT