मुंबई

महापालिका शाळांत चौथी भाषा नकोच; प्रशासनाची ठाम भूमिका 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई -  मुंबईत चौथी भाषा खपवून घेणार नाही, असा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका जाहीर सभेत इशारा दिला होता. मुंबई महापालिका प्रशासनानेही पालिका शाळांत चौथी भाषा नकोच, अशी ठाम भूमिका घेतली आहे. तीन भाषांव्यतिरिक्त अन्य भाषांचा भार विद्यार्थ्यांवर टाकणे मानसशास्त्रीयदृष्ट्या सयुक्तिक होणार नाही, असे प्रशासनाने म्हटले आहे. 

पालिकेच्या प्राथमिक शाळांत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलांना लहानपणापासूनच मातृभाषेसह इंग्रजी, हिंदी, संस्कृत या भाषा आत्मसात करण्याचे वर्ग सुरू करावेत, अशी मागणी नगरसेवक भालचंद्र आंबोरे यांनी 2015 मध्ये ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. या मागणीवर अभिप्राय प्रशासनाने देऊन तीन भाषांव्यतिरिक्त अन्य भाषांचा भार मुलांवर नको, असे स्पष्ट केले आहे. प्रचलित शिक्षणपद्धतीत इयत्ता पहिली ते चौथीसाठी मातृभाषेव्यतिरिक्त इंग्रजी हा विषय आहे. या दोन भाषांव्यतिरिक्त पहिली आणि दुसरीच्या स्तरावर संभाषणकौशल्यासाठी मराठी भाषा अन्य भाषिक शाळांमध्ये अनिवार्य आहे. इयत्ता तिसरीपासून अन्य भाषिक शाळांमध्ये (उर्दू, तमीळ, तेलुगू, कन्नड, गुजराती) मराठी भाषेचे पाठ्यपुस्तक आणि मराठी भाषेची लेखी परीक्षा यांचा समावेश आहे. त्यांच्या वयोगटाला आवश्‍यक असणारा आणि मानसशास्त्रीयदृष्ट्या समर्पक अशा तीन भाषांचा समावेश अभ्यासक्रमात केलेला आहे. त्यामुळे चौथ्या भाषेचा भार मुलांवर नकोच, असे अभिप्रायात पालिका प्रशासनाने म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT