No Local body elections without OBC reservation mumbai sakal
मुंबई

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको!

समर्पित आयोगासमोर स्थानिक, राजकीय पक्षांची भूमिका

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी भूमिका कोकण विभागातील विविध पक्षांसह सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी बुधवारी समर्पित आयोगासमोर मांडली.राज्यातील नागरिकांच्या मागास वर्गाच्या (ओबीसी) बाबतीत राजकीय मागासलेपणाच्या स्वरूपाची व परिणामांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात समर्पित आयोगाने कोकण विभागाचा दौरा केला. कोकण भवनमध्ये आलेल्या आयोगाच्या सदस्यांनी विविध पक्ष, संघटना, संस्था यांचे म्हणणे ऐकून त्यांच्‍याकडून निवेदने स्वीकारली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षणासाठी समर्पित आयोग गठित केला आहे. या आयोगाच्या कार्यकक्षेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरूपाची व परिणामांची चौकशी करण्यासाठी सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने बुधवारी समर्पित आयोगाचे अध्यक्ष जयंतकुमार बांठिया, सदस्य महेश झगडे, डॉ. नरेश गिते, ह. बा. पटेल, सदस्य सचिव पंकज कुमार, डॉ. शैलेशकुमार दारोकार, प्रा. जेम्स आले होते.

या वेळी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिह्यातील ओबीसी संघटनांचे प्रतिनिधींसोबत अल्पसंख्याक समाजातील प्रतिनिधींनीही निवेदने देत आपली भूमिका मांडली. या सर्व निवेदनांची नोंद आयोग घेत असल्याची माहिती समर्पित आयोगाच्या सदस्य सचिवांनी दिली. कोकण विभागातील विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकेत या संदर्भातील निवेदने प्राप्त झाल्यास ती आयोगाकडे पाठवावीत, अशा सूचना आयोगाकडून यावेळी देण्‍यात आल्‍या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Earthquake : मराठवाड्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के ! अचानक भयंकर आवाज अन् जमीन थरथरली; भीतीने लोक घरांबाहेर पळाले

Gold Rate Today: जुलैच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याने दिला मोठा धक्का! 24 कॅरेट सोनं तब्बल 3,770 रुपयांनी महागलं; पाहा आजचा ताजा भाव

Ketan Agrawal Murder : केतनचा मोबाईल कुठे होता? हत्येत तिसरी व्यक्ती? राजस्थान कनेक्शन काय?; केतन अग्रवाल प्रकरणात ३ मोठे खुलासे

Nagpur Crime : रक्षकच निघाले भक्षक! वाघाच्या कातडीसह २ पोलिसांना अटक, वन्य तस्करी टोळीचे होते मध्यस्थ; खवल्या मांजराचे खवले जप्त

IND vs ENG, T20I: 'तू काय करतोय यार ईशान...', अभिषेक शर्मा थर्ड अंपायर निर्णय देत असताना का वैतागला? Video Viral

SCROLL FOR NEXT