मुंबई

मनसेकडून मुंबईभरात ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’चे पोस्टर

पूजा विचारे

मुंबईः  ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मोहिम राबवली आहे. मात्र आता या मोहिमेला आक्रमक स्वरुप आल्याचं दिसतंय. मनसेनं मुंबईत अॅमेझॉनविरोधात फलक लावलेत. या पोस्टर्सवर नो मराठी, नो अॅमेझॉन असा मजकूर लिहिला आहे. 

वांद्रे पूर्व, तसंच पश्चिम, माहीम, अंधेरी आणि रेक्लमेशनच्या परिसरातल्या रस्त्यांवर मनसेनं हे पोस्टर्स लावलेत. मनसे नेते अखिल चित्रे यांनी हे पोस्टर लावलेत. याआधीही मनसेनं अॅमेझॉनच्या मुंबईतल्या कार्यालयाबाहेर पोस्टर झळकावले होते. या पोस्टरमधून मनसेनं अॅमेझॉनला तुम्हाला महाराष्ट्रात आमची भाषा मान्य नाही. मग आम्हाला महाराष्ट्रात तुम्ही मान्य नाही, अशी कानउघडणी करत इशाराही दिला होता.

अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा, या मागणीसाठी मनसेनं या कंपन्यांच्या ऑफिसवर धाड टाकली होती. मुंबईच्या बीकेसी परिसरात या दोन्ही कंपन्यांची ऑफिस आहेत. 

No marathi no amazon maharashtra navnirman sena posters

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अयोध्या हादरली! मेडिकल कॉलेजच्या 'एक्स-रे रूम'मध्ये सापडला बॉम्ब बनवण्याचा फॉर्म्युला; तीन जण ताब्यात

Konkan Railway: कोकणवासीयांसाठी आनंदवार्ता! आता दररोज मुंबईहून कोकणात रेल्वे धावणार, प्रशासनाची मोठी घोषणा; वाचा सविस्तर

Crime News: लपंडाव खेळताना पाशवी कृत्य! शेतात नेलं अन्...; ९ वर्षांच्या मुलीवर ५ जणांचा अत्याचार

August 2026 Calendar: स्वातंत्र्य दिन, गटारी अमावस्या, नागपंचमी ते रक्षाबंधन; जाणून घ्या ऑगस्ट महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सिंहस्थ प्राधिकरणाची बैठक सुरू

SCROLL FOR NEXT