sk.jpg
sk.jpg 
मुंबई

कोणाचीही हयगय केली जाणार नाही - पोलिस आयुक्त संजय कुमार 

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : कामोठे कार अपघात प्रकरणात कोणाचीही हयगय केली जाणार नाही. मग तो आरोपी असो वा त्याला वाचवण्यासाठी सरसावलेले कोणीही असो असा सज्जड दम वजा इशारा नवी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी दिला. रविवारी संध्याकाळी कार चालकाने भरधाव वेगात दोन जणांना चिरडून टाकल्यानंतर संबंधित कार चालकाला भाजप नेत्याच्या मध्यस्थीने पोलिस वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत अशी बातमी सकाळने सोमवारच्या अंकात दिली होती. त्याचे पडसाद आज पोलीस आयुक्तलयात उमटले. 

सकाळी पोलिस आयुक्त संजय कुमार यांच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत कुमार यांनी कामोठे अपघात प्रकरणातील तपासाची माहिती जाणून घेतली. यावेळी सकाळच्या बातमीचा हवाला देत परिमंडळ - 2 च्या पोलिस अधिकाऱ्यांची झाडाझडती केली. या प्रकरणात आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा कशी होईल या दिशेने तपास करण्याच्या सूचना कुमार यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.

रविवारी अपघात घडला तेव्हा अपघातात जखमी झालेल्या अपघातग्रस्तांना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील श्रद्धा जगतापी या महिलेची साधी माहिती देखील पोलिसांना अखेरपर्यंत मिळू शकली नाही. सकाळच्या प्रतिनिधीने जेव्हा माहिती घेतली तोपर्यंत त्या एका खाजगी रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतल्या होत्या.

या प्रकरणातील आरोपी हरविंदर सिंग हा पोलिसांना चकवा देऊन रुग्णालयात भरती झाला होता. गाडीत दारूची बाटली न सापडणे या बाबींवरून पोलिस काही प्रमाणात आरोपीला मदत करीत असल्याची शंका नागरिकांकडून उपस्थित होत आहे. अपघातातील जखमींना कोणत्या रुग्णालयात भरती केल्याचे पोलिसांना माहीत नसल्यावरून या प्रकरणात पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. 

"कामोठे अपघात प्रकरणात मी स्वतः जातीने लक्ष घालत आहे. या प्रकरणात आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्याबाबद्दल सहानभूती आहे. पण कोणाला ही मध्यस्थी करू देणार नाही."
संजय कुमार, पोलिस आयुक्त, नवी मुंबई.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

Loksabha 2024: मतदानाचा घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? वाचा काय सांगतो लोकसभेचा इतिहास 

Latest Marathi News Live Update: किरकोळ बाजारात तूरदाळीचे दर दहा टक्क्यांनी वाढले

Hassan Sex Scandal: माजी पंतप्रधानांच्या नातवाच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Sakal Podcast : सुळे विरुद्ध पवार, बारामती नेमकी कोणाची? ते कांदा निर्यातबंदी उठवली हा जुमलाच

SCROLL FOR NEXT