kishori pednekar Esakal
मुंबई

कर्नाटकात ओमिक्रॉनचे रूग्ण; मुंबई महापालिका अलर्टवर

पराराज्यातून येणाऱ्या प्रवाशांनादेखील कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक असणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कर्नाटकात (Karnataka) आज आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या (Omicron Patient) रूग्णांमुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वाढता धोका लक्षात घेता मुंबई महापालिका (Mumbai corporation) सर्तक झाली आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai mayor Kishori Pednekar) यांनी दिली आहे. तसेच मुंबईत सध्या ओमिक्रॉनचे रूग्ण नसून सर्व ती खबरदारी घेतली जात आहे. दोघाजणांचे सॅम्पल करस्तुरबाला पाठवले असून त्यांचे रिपोर्ट उद्या किंवा परवापर्यंत येणे अपेक्षित आहे. विमानताळावर सध्या 80 टेस्टिंग काउंटर तर 50 स्कॅनिंग सेंटर असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई विमानतळावर (Mumabi Airport) येणाऱ्या प्रवाशांना लसीकरण किंवा आरटीपीसीआर चाचणी (RT-PCR) अनिवार्य असणार आहे, असे त्या म्हणाल्या. कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवले जात आहे. राज्याने कोरोनाच्या दोन्ही लाटा अगदी जवळून अनुभवल्या आहेत. त्यामुळे तशी परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी सर्व ती खबरदारी घेतली जात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले केले.

पेडणेकर म्हणाल्या की, धोका असलेल्या तीन देशांची यादी जाहीर करण्यात आली असून तेथून राज्यात येणाऱ्या प्रवाशांवर अधिक बारकाईने लक्ष देण्यात येत आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची 15 दिवसाची बॅक हिस्ट्री तपासणार असून, त्यात जर कुणी पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याचे सॅम्पल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविले जाणार आहे.

मुंबईत 28 तारखेला दाखल झालेल्या 736 प्रवाशांपैकी 3 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर 30 तारखेला 2878 प्रवासी दाखल झाले असून त्यातील एका प्रवाशाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, तर एका प्रवाशाची तपासणी अद्याप बाकी असल्याचे त्या म्हणाल्या. एक डिसेंबर रोजी 79 प्रवासी आले होते, त्यातील 60 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 2 जणांची तपासणी बाकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT