Udhav Thakare.jpg Sakal
मुंबई

मातोश्रीवर यायची कुणाची हिंमत नाही; मुख्यमंत्र्यांचा आक्रमक पवित्रा

राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी हजारो शिवसैनिक मातोश्रीसमोर जमले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी उद्या सकाळी मातोश्रीसमोर येऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, राणा दाम्पत्याच्या या इशाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत मातोश्रीवर यायची कुणाची हिंमत नाही असा, आक्रमक बाणा घेतला आहे. ठाकरेंच्या या भूमिकेमुळे उद्या सकाळी मातोश्रीसमोर राणा दाम्पत्याकडून हनुमान चालिसेचे पठण होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी हजारो शिवसैनिक मातोश्रीसमोर जमले आहेत. त्यांच्याशी संवाद साधताना ठाकरेंनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हात जोडून तुम्ही जा घरी, 'मातोश्री' समोर यायची कुणाची हिंमत नाही असे म्हटले आहे. मातोश्री समोर हजारो शिवसैनिक (Shivsena) जमा झाले असून, त्यांनी राणा दाम्पत्याला येथे पाऊल ठेवू देणार नसल्याचा तसेच रात्रभर येथेच पहारा देण्याचा निर्धार केला आहे. तसेच आपण येथून कुठेही जाणार नसून, राणा दाम्पत्याला चांगलाच धडा शिकवणार असल्याचे शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना सांगितले. परंतु, यावेळी तुम्ही सर्वजण सकाळपासून येथे जमला आहात. तुम्ही घरी जा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हात जोडून उपस्थित हजारो शिवसैनिकांना केली.

हनुमान चालिसाचे पठण करण्यावर राणा दाम्पत्य ठाम

तुम्ही राज्याचे प्रथम नागरिक आहात. हनुमान जयंती होती त्यावेळी तुम्ही हनुमानाच्या मंदिरात जाऊन महाराष्ट्रातील संकट घालविण्यासाठी प्रार्थना केली नाही. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत कधी भाष्य करत नाही. मुख्यमंत्री दोन वर्षानंतर मंत्रालयात जातात, तर महाराष्ट्र कोणत्या दिशेला चालला? याचा विचार करा. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार ऐकत मोठे झाले आहोत. आज बाळासाहेबांची तिसरी पिढी राजकारणात आहे. मी मुंबईची मुलगी असून विदर्भाची सून आहे. सर्व ताकद माझ्यासोबत आहे. कोणीही माझं काही बिघडवू शकत नाही, असा इशारा खासदार नवनीत राणांनी शिवसैनिकांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : युट्युबर ध्रुव राठी यांची सुटका

IND A vs AUS A: पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभव, आता व्हाईटवॉश टाळण्याचं आव्हान! ऑस्ट्रेलिया अने जिंकली नाणेफेक; भारत अ प्रथम फलंदाजीला

Ratnagiri ST Bank: चार्जिंग स्टेशनचा महागडा निर्णय ?;नफ्यातील बँक पाडून एसटीवर भाड्याचा बोजा

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT