

IND A vs AUS A
esakal
IND A vs AUS A: भारतीय क्रिकेटमधील डोमेस्टिक क्रिकेटमध्ये भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ या संघांदरम्यान आज तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. हा सामना पुद्दुचेरी येथील क्रिकेट असोसिएशन पुद्दुचेरी सिचेम ग्राउंडवर सुरू आहे.
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे आजचा सामना जिंकून व्हाईटवॉश टाळण्याचं आव्हान भारतीय संघासमोर आहे.