म्‍हसळा : खासगी नळावरून पाणी आणताना महिला.
म्‍हसळा : खासगी नळावरून पाणी आणताना महिला. 
मुंबई

म्हसळा तालुक्‍यातील मेंदडीत पाण्‍यासाठी पायपीट

सकाळ वृत्तसेवा

म्हसळा (वार्ताहर) : म्हसळा तालुक्‍यातील मेंदडी गावामधील बौद्ध व मुस्लिम वस्तीत गेले सहा महिने पाणीपुरवठा होत नाही. या संदर्भात नागरिकांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी म्हसळा यांच्याकडे तक्रार केली आहे.

मेंदडी गावातील बौद्ध व मुस्लिम समाज, प्राथमिक आरोग्य केंद्र व परिसरात आणि अन्य काही भागांत गेल्या सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा होत नाही. १९३३ संमिश्र लोकसंख्या असलेल्या या गावात सरकारच्या माध्यमातून २००७-०८ पासून वर्धीत वेग कार्यक्रमांर्तगत नळ पाणीपुरवठा योजनेला मंजुरी होती. अध्यक्ष व सचिव ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती मेंदडीच्या माध्यमातून कामाची पूर्तता झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत गट विकास अधिकारी व ग्रामपंचायतीकडे याबाबतचा पत्रव्यवहारही केला आहे. मात्र, तरीही यावर प्रशासनाने तोडगा काढला नाही. 

नागरिकांनी मे-जूनमध्ये खासगी टॅंकरमार्फत पाणी विकत घेतले होते. तर गेले काही महिने पावसाळी पागोळीचे पाणी वापरून वेळ मारून नेल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते. मेंदडी गावाला मेंदडी धरणातून ग्रॅन्हेटी व पपांच्या साह्याने पाणीपुरवठा होत असतो. परंतु, म.रा.वि.वि. कंपनीचे दोन लाखाचे वीजबिल थकीत आहे. स्थानिक ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीने निगा, देखभाल, दुरुस्ती करणे आता बंद केले आहे. यासाठी शेख नजीर, अब्दुल रहेमान चांदले, सुनीता मोरे, मीनाक्षी येलवे यांनी व अन्य मंडळींनी तहसीलदार व गटविकास अधिकारी म्हसळा यांच्याकडे तक्रारही केली. 

पुणे-दिघी रस्त्याचे कामात जलवाहिनी अडकल्याने तूर्त काही भागांत पाणीपुरवठा होत नाही. २००७-०८ मध्ये आलेला निधी संपवून काम पूर्ण केल्यावर योजना अंतिम करण्यासाठी स्थानिक ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडे योजनेबद्दलचे वेगवेगळे दाखले, प्रमाणपत्रे, ठराव सतत मागणी करूनही कागदपत्रे दिली नसल्याने १९ जुलैला ही योजना ग्रामपंचायत मेंदडीकडे वर्ग करण्यात आली आहे. योजनेतून पाणीपुरवठा करण्याची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे.
- युवराज गांगुर्डे, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, म्हसळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT