Mumbai Court Issues Non-Bailable Warrant Against BJP MLA Nitesh Rane  esakal
मुंबई

Nitesh Rane: नितेश राणेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट, माझगाव कोर्टाचा दणका! नेमकं काय आहे प्रकरण?

Non-Bailable Warrant Issued Against Nitesh Rane in Defamation Case: न्यायालयाने जानेवारी महिन्यात जारी केलेले वॉरंट रद्द केले होते कारण नितेश राणे फेब्रुवारी महिन्यात हजर झाले होते. परंतु त्यानंतर त्यांनी वारंवार गैरहजेरी लावल्यामुळे कोर्टाने पुन्हा वॉरंट जारी केले.

Sandip Kapde

मुंबई: माझगाव कोर्टाने बुधवारी भारतीय जनता पार्टी (बीजेपी) आमदार नितेश राणे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. शिवसेना (यूबीटी) नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्याच्या खटल्यात कोर्टाने ही कारवाई केली आहे.

अब्रुनुकसानीचा दावा-

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी अ‍ॅड. मनोज पिंगळे यांच्या मार्फत नितेश राणे यांच्या विरोधात माझगाव न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीला नितेश राणे अनुपस्थित होते. त्यांच्या वकिलांनी हजेरीपासून सूट देण्याची विनंती केली होती, परंतु न्यायिक मजिस्ट्रेट (प्रथम श्रेणी) आरती ए. कुलकर्णी यांनी ती नाकारली आणि थेट अजामीनपात्र वॉरंट जारी केले. यापूर्वीही, जानेवारी महिन्यात न्यायालयाने नितेश राणे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

कोर्टाच्या निर्णयामागील कारणे-

न्यायालयाने जानेवारी महिन्यात जारी केलेले वॉरंट रद्द केले होते कारण नितेश राणे फेब्रुवारी महिन्यात हजर झाले होते. परंतु त्यानंतर त्यांनी वारंवार गैरहजेरी लावल्यामुळे कोर्टाने पुन्हा वॉरंट जारी केले. संजय राऊत यांच्या वकिलांनी नितेश राणे यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्याची विनंती केली होती, जी कोर्टाने मान्य केली.

नितेश राणे यांची वादग्रस्त टिप्पणी-

नितेश राणे, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आहेत. त्यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात संजय राऊत यांच्या विरोधात वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यांनी संजय राऊत यांना ‘सांप’ असे संबोधले होते आणि सांगितले होते की राऊत एक महिन्याच्या आत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील होतील.

पुढील सुनावणी आणि अटक टाळण्याचे आव्हान-

नितेश राणेंनी अटक टाळण्यासाठी १७ ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी ही तारीख निश्चित केली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे नितेश राणे यांच्यावर कायदेशीर दबाव वाढला असून, त्यांना आता कोर्टाच्या आदेशाचे पालन करावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: धक्कादायक! विश्वविजेता भारत हरला; आयर्लंडने करेक्ट कार्यक्रम केला, श्रेयसच्या नेतृत्वाची खराब सुरुवात; नेमकं काय घडलं?

भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटलं अन्... पिकअप व्हॅन दरीत कोसळली, ६ जणांचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update: आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल या प्रकरणातील चौकशीनंतर पोलीस ठाण्यातून निघून गेला

ऐकावं ते नवलंच! ब्रिटनच्या राजालाही भरावा लागतोय कर, ३७३ कोटींच्या टॅक्समागची नेमकी भानगड काय?

Karad Bus Stand Robbery: कऱ्हाड बसस्थानकातील जबरी चोरी उघडकीस; पती-पत्नी अटक

SCROLL FOR NEXT