मुंबई

Corona Updates:अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही घरात 7 दिवस क्वारंटाईन बंधनकारक

भाग्यश्री भुवड

मुंबई: ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार समोर आल्यानंतर राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने कोरोनाला हरवण्यासाठी लढा तीव्र केला आहे. युके, मिडील इस्ट आणि युरोप या देशांतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना 7 दिवस क्वारंटाईन केले जाणार आहे.

त्यानंतर कोरोनाची आरटीपीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली असून चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. तरीही पुढील 7 दिवस घरातच क्वारंटाईन राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याबाबतचे परिपत्रक मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी काढले आहे. दरम्यान, विविध देशांच्या दुतावासात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना वंदे भारत मिशन अंतर्गत मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल असे आयुक्तांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

कोरोनाचा नवीन प्रकार समोर येताच राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने सावध भूमिका घेत इंग्लड मधून येणारी विमान सेवा 23 डिसेंबर ते 5 जानेवारी 2021 पर्यंत बंद केली आहे. तसेच युके, साऊथ अफ्रिका, आखाती देश (मिडील इस्ट) आणि युरोपियन देशातून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर दाखल झाल्यानंतर मुंबईतील विविध हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

7 दिवसांनंतर अहवाल पॉझिटिव्ह आला तर पुढील उपचारासाठी सेव्हन हिल्स आणि जीटी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. मात्र 7 दिवसांनी कोरोना अहवाल निगेटिव्ह आला तरी पुढील 7 दिवस होम क्वारंटाईन राहणे बंधनकारक करण्यात आल्याचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.

-------------------

(संपादन- पूजा विचारे)

Now 7 days quarantine is mandatory home even after 7 days report negative

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirur Crime : राज्य उत्पादन शुल्क विभागाने घरावर छापा टाकून विदेशी दारूचा लाखो रुपयाचा साठा केला जप्त

HSC Economic Paper : बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरच्या वेळापत्रकात अंशतः बदल

Sheikh Hasina: शेख हसीना यांच्या मायदेशी परतण्याच्या घोषणेनंतर बांगलादेशात हिंसाचार; पंतप्रधान म्हणाले, आता खूप झाले...

Groundnut Rate Hike : शेंगदाण्याने गाठला दीडशेचा उच्चांक; पंधरा दिवसांत पाच रुपयांची वाढ; उत्पादनात मोठी घट

PM Narendra Modi: 'कितीही खाऊ घातले तरी तुमचे पोट भरत नाही...'; पंतप्रधान मोदींनी उद्योगपतींना फटकारले

SCROLL FOR NEXT