nose filter 
मुंबई

आता मास्क वापरण्याची गरज नाही, कारण बाजारात आलं आहे 'असं' भन्नाट काही...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाचा विळखा देशावर आणि राज्यावर अजूनच घट्ट होत चालला आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा तब्बल ५५ हजारांच्या वर पोहोचला आहे. तसंच सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. नागरिकांना मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या मास्कचा आता नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. मात्र आता तुम्हाला हे मास्क घालण्याची गरज भासणार नाही. 

कोरोनाचे विषाणू हे हात, नाक, तोंड या मार्फत आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढू नये म्हणून सरकारनं प्रत्येकाला मास्क वापरणं बंधनकारक केलं आहे. मात्र जसे या मास्कचे फायदे आहेत तसंच या मास्कमुळे अनेकांना त्रास देखील होतो.  

पोलिस, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांना दिवसरात्र हे मास्क तोंडाला लावून ठेवावं लागतंय. तसंच घराबाहेर पडलेल्या प्रत्येकाला मास्क वापरावं लागतंय. त्यामुळे काहींना श्वसनाचा त्रास होतोय. तर काही लोकांना मास्कचा कंटाळा आलाय. मात्र आता तुम्ही मास्क न लावताही कोरोनापासून तुमचा बचाव करू शकणार आहात.   

काही कंपन्यांनी लोकांना मास्कचा आलेला कंटाळा बघून विशेष 'फिल्टर्स' तयार केले आहेत. हे फिल्टर्स विशेष पद्धतीनं तयार करण्यात आले आहेत. हे फिल्टर्स नाकाच्या आतल्या बाजूस घातल्यानंतर यामुळे तुमचा प्रदुषण, अलर्जी आणि व्हायरसपासून बचाव होऊ शकतो असा दावा या कंपन्यांकडून करण्यात आला आहे. 

कसं वापरतात हे फिल्टर: 

हे फिल्टर्स मास्कप्रमाणे नसणार आहेत. हे फिल्टर्स नाकात घालता येणार आहेत. नाकपुड्यांच्या मधून हे फिल्टर्स आत घालता येणार आहेत. विशेष म्हणजे हे फिल्टर्स स्वच्छ करून तुम्हाला पुन्हा पुन्हा वापरता येणार आहेत. या फिल्टर्सवर अनेक चाचण्या करण्यात आल्या आहेत असा दावा या कंपन्यांनी केला आहे. हे फिल्टर्स सध्या ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 

मात्र असं जरी असलं तरीही सरकारकडून या फिल्टर्सच्या वापराबाबत कोणतीही माहिती अद्याप दिली गेली नाहीये. त्यामुळे जोपर्यंत सरकारकडून अधिकृतरीत्या सांगितलं जात नाही तोवर या गोष्टी न वापरलेल्या बऱ्या. 

now companies introduced new nose filter read full story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं उच्चांकापासून 26 हजारांनी स्वस्त! पाहा ताजा भाव; पुढे सणासुदीच्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?

पत्नीच्या खून प्रकरणी पती-सासऱ्यासह ८ जण तुरुंगात गेले, १२ वर्षांनी जिवंत सापडली महिला

MPSC Exam Success Story : शेतकरी बापाची लेक अन् आई पोलिसात! जाधववाडीच्या निकिताची MPSC मध्ये गगनभरारी, महसूल सहाय्यकपदी निवड

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Caste Validity Certificate : जातवैधता प्रमाणपत्राचा आग्रह न धरता तात्पुरता प्रवेश द्या; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

SCROLL FOR NEXT