मुंबई

आता शाळा भरणार गुगलवर; शिक्षक विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग घेणार, होमवर्क, असाईनमेंट, प्रॅक्टीक्लसही पुन्हा सुरू होणार

तेजस वाघमारे

मुंबई  : राज्यातील शिक्षण विभागाने ऑनलाइन शाळा सुरु केल्या आहेत. ऑनलाइन शाळेसाठी आता शिक्षण विभागाला गुगलच्या माध्यमातून जागतिक व्यासपीठ मिळाले आहे, गुगलच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग घेणार असून गृहपाठ, असाईनमेंट, प्रॅक्टीक्लसही पुन्हा सुरू होणार आहेत. गुगल शाळेसाठी आतापर्यत राज्यातील 1 लाख 34 हजार शिक्षकांनी नोंदणी केली आहे. त्यानुसार ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यत गुगलवरील शाळेची हजेरी सुरू होणार आहे. सर्व माध्यमाच्या शाळांसाठी हा पर्याय विनामूल्य खुला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची गुरूवारी (ता. 6) घोषणा करण्यात आली. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांना पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण देण्यात आले आहे. ऑगस्ट अखेरपर्यत सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन या उपक्रमाचा लाभ राज्यातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. गुगलवरील जी स्वीट फाॅर एज्युकेशन, गुगल क्लासरूम, गुगल मीटद्वारे शिक्षक विद्यार्थ्यांची शाळा घेणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतरही शाळा या जागतिक पर्यायांचा वापर विद्यार्थ्यांसाठी करू शकणार आहेत.

या क्लासरूमसाठी शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी शाळा व्यवस्थापनाकडून लाँगीन आयडी व पासवर्ड देण्यात येणार आहे. तसेच लवकरच शाळांनुसार शिक्षकांना G-suite आयडी व पासवर्डही दिले जाणार आहेत.

गुगलवरील शाळेची वैशिष्ट्ये

- तुकडीप्रमाणे वर्ग भरणार. उदा. 9-अ, 5-ब, 7-क.

- विद्यार्थ्यांची प्रगती, शिक्षकांची शिकवण्याची पद्धत समजणार.

- विद्यार्थ्यांची उपस्थिती, किती शाळांनी वापर केला, किती शाळांनी केला नाही याचे ट्रॅकिंगही.

- विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास शिक्षकांना तपासताही येणार.

- असायनमेंट, नोट्स, शिक्षकांच्या टीप्स याचे रेकाॅर्ड कायम राहणार


शाळांसाठी असे असेल लाॅगीन

- सरकारी व पालिका शाळा

mahaeschool.ac.in

- खासगी अनुदानित शाळा

mahaeschool.co.in

- खासगी विनाअनुदानित व इतर

mahaeschool.co.in

----------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : आजीबाईने डिलीट केले १२ व्होट..! अर्ज कोणी केला, काय म्हणाल्या गोडाबाई? राहुल गांधींनी समोर आणला 'घोळ'

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयुक्तांना १८ वेळा पत्र पाठवले, तरीही काहीही उत्तर मिळाले नाही

Asia Cup 2024 Super 4 Scenario : भारत, पाकिस्तान यांची जागा पक्की; अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांना काय करावं लागणार?

ज्ञानेश कुमार मतचोरांचं संरक्षण करतायत, मी पुराव्याशिवाय बोलत नाहीय : राहुल गांधी

iPhone Air! अ‍ॅपलचा कागदासारखा पातळ स्मार्टफोन; कुणी खरेदी करावा अन् कुणी अजिबात घेऊ नये? एकदा बघाच

SCROLL FOR NEXT