mumbai police
mumbai police 
मुंबई

अरे वाह! कोरोनाकाळात 'या' आधुनिक पद्धतीनं मिळणार पोलिसांना दिलासा..समोरासमोर समस्या मांडता येणार  

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: जागतिक संकट बनलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला टाळण्यासाठी पोलिस दल अहोरात्र झटत असुन, यामध्ये आत्तापर्यंत राज्यात 22 पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबईत13 पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तरी देखील पोलिस दल प्राणांची बाजी लावून कोरोनाशी झुंज देत आहेत. यामुळेच या पोलिस अधिकारी-कर्मचा-यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन विभागाचे सह-पोलिस आयुक्तांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आज्ञांकित कक्ष सुरु केला आहे. त्याच्यामार्फत  पोलिसांच्या समस्या समोरसमोर सोडवल्या जाणार आहेत.

जे पोलिस अधिकारी-कर्मचारी कोणत्याही समस्येनं ग्रस्त असतील ते या सर्व समस्या प्रशासन विभागाच्या सह-पोलीस आयुक्तांसमोर मांडतील. तसेच या सर्व पोलिस अधिकारी-कर्मचा-यांच्या प्रश्नांची सोडवणुक करण्याचा निर्धार वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी केल्याने,पोलिस दलातुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तर वरिष्ठ पोलिस अधिका-यांचा पाठींबा असल्याने, कोरोनाच्या संकटात संपूर्ण झोकुन देऊन काम करणा-या पोलिसांना दिलासा मिळाला आहे. 

राज्यात जवळपास 2 हजार 95 पोलिस कोरोनाने ग्रस्त आहेत. तर हीच आकडेवारी मुंबईत सर्वात मोठी आहे. त्यात एक हजार 859 कर्मचारी, तर 236 अधिका-यांचा समावेश आहे. त्यातील मुंबईत एक हजार 203 एवढे पोलीस कोरोनाच्या अजगरी विळख्यात सापडले आहेत.  तर यातील जवळपास 200 पोलिस कोरोनावर मात करीत पुन्हा ऑन ड्युटी हजर झाले आहेत. कोरोनाच्या महामारीला कायमस्वरुपी पराजित करण्यासाठी हे कोरोना योद्धे सज्ज झाले आहेत.

तर दुसरीकडे या कोरोना योद्ध्यांना देखील अनेक समस्या तसेच अडी-अडचणीना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये महिला पोलिस अधिकारी-कर्मचा-यांची संख्या अधिक आहे. त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. यामुळे या सर्व पोलिसांच्या समस्यांची सोडवणुक करण्यासाठी प्रशासन विभागाच्या सह-पोलिस आयुक्तांनी व्हिडीओ काॅन्फरसिंगद्वारे आज्ञांकित कक्ष सुरु केला आहे. यापुर्वी या आज्ञांकित कक्षाद्वारे पोलिस आयुक्तांना देखील भेटुन समस्या मांडता येत होत्या. मात्र सध्याची कोरोना सदृश परिस्थिती पाहता, ते शक्य नसल्याने व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आज्ञांकित कक्ष सुरु केला असुन, या सर्व समस्या प्रशासन विभागाच्या सह-पोलीस आयुक्तां समोर मांडता येणार आहेत. 

यासाठी ज्या पोलिसांच्या समस्या आहेत, त्यांनी कक्ष दोनशी संपर्क साधत नावे नोंदविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार, या सर्व पोलिसांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिका-याने दिली.

गेल्या 24 तासांत 131 पोलिसांना कोरोना: 

राज्यात  2095 पोलिस कोरोनाने ग्रस्त आहेत. तर हीच आकडेवारी मुंबईत सर्वात मोठी आहे. त्यात एक हजार 859 कर्मचारी, तर 236 अधिका-यांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत 131 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 897 पोलिस कोरोनावर मात करून परतले आहेत.

now police will tell their problems by video conferencing read full story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT