ppe kit 
मुंबई

आता औषध दुकानांमध्ये मिळणार पीपीई कीट.. एफडीएकडून दुकानांची यादी जाहीर...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरोनाला रोखण्यासाठी आणि रुग्णांवर उपचार करण्यासाठी लढणार्‍या डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांसाठी  पीपीई किट औषध दुकानांमधून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पीपीई किट उपलब्ध असलेल्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील औषध दुकानांची यादी अन्न व औषध प्रशासन विभागाने रविवारी जाहीर केली. 

पीपीई किट बनवायला एन 95 मास्कसहीत 330 रुपये खर्च येत असल्याने किमान 400 रुपयांपर्यंत पीपीई किट उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

पीपीई किटची उपलब्धता प्रत्येक जिल्ह्यात होण्यासाठी जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त (ड्रग्ज) हे यासाठी नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. पीपीई किटचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी विक्रेते व किट निर्मात्यांशी संपर्क साधण्याचे काम हे सहायक आयुक्त करणार आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे.

पीपीई किट वितरणामध्ये आणखी औषध दुकानदांना सहभागी होण्याची इच्छा असल्यास त्यांनी आपल्या जिल्ह्यातील सहायक आयुक्त (ड्रग्ज) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन या विभागाने केले आहे.

400 रुपयांपर्यंत पीपीई कीट उपलब्ध होणार:
 

आजही खुल्या बाजारात पीपीई किट हे 1500 रुपये ते 2500 रुपयांपर्यंत विकले जातात. पण यापुढे सलून, इलेक्ट्रीशियन, प्लंबर आणि इतर लघुउद्योजकांनाही पीपीई किट आवश्यक होणार असल्याने सर्वसामान्यांना परवडेल अशाच किंमतीत पीपीई किट उपलब्ध करून दिले जातील. पीपीई किटचा खर्च आणि इतर गोष्टी बघता किमान 400 रुपयांपर्यंत पीपीई कीट उपलब्ध होतील, असे एफडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

now PPE kit will be available at medical stores read full story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Allegation : आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे निवडणूक जिंकले, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

१ हजार ते ६,००० रुपयांत गरबा पार्टनर, व्हायरल पोस्टरनंतर भाजप आमदार आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

CSK पाठोपाठ मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने केली नव्या प्रशिक्षकाची घोषणा! RCB चा कोच फोडला, कोण आहे तो?

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगातील वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांचं महत्वाचं भाष्य

प्रमोशनला आला नाही म्हणून वाद, १ कोटींचा दंड; अंकित मोहनने मांडली त्याची बाजू, म्हणाला...

SCROLL FOR NEXT