corona police 
मुंबई

कोरोनाग्रस्त पोलिसांसाठी आता डॉक्टरांचे विशेष पथक; आणखी एका पोलिसाचा मृत्यू.. 

सकाळ वृत्तसेवा, सकाळवृत्तसेवा

मुंबई: मुंबईत गुरूवारी आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील मृत पोलिसांचा आकडा 40 वर पोहोचला आहे. मुंबई पोलिस दलातील कोरोना बाधीत पोलिसांवरील उपचारावर लक्ष ठेवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तयार करण्यात आले आहे.

पायधुनी पोलिस ठाण्यात कार्यरत 57 वर्षीय सहाय्यक उपनिरीक्षकाचा गुरूवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. ते दक्षिण मुंबईतील रहिवासी होते. तीन महिन्यात ते निवृत्त होणार होते. पण त्यापूर्वीच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

चार दिवसांपूर्वी उपचारासाठी त्यांना जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 55 वर्षांवरील पोलिसांना कोरोना काळात सुटी दिल्यामुळे ते सध्या घरीच होते. त्यांच्या पश्चात मुलगा व मुलगी असा परिवार आहे. राज्यातील  62 पोलिसांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाबाधीत पोलिसांसाठी डॉक्टरांचे विशेष पथक:

कोरोना बाधीत पोलिसांचे स्वास्थ व त्यांच्या देण्यात आलेले उपचार यावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष पथक नियुक्त केले आहे.  त्यांच्या मार्फत प्रकृती गंभीर असलेल्या पोलिसांवर सुरू असलेल्या उपचारांवर लक्ष ठेवले जात आहे. याशिवाय लक्षण अलेल्या पोलिसांच्या स्थितीबाबतही पाहणी केली जात आहे. 

हे पथक नागपाडा येथील पोलिस रुग्णालयात सध्या बसत आहे. याशिवाय मुंबईतील चार कोविड केअर सेंटर व पोलिस हेल्पलाईनकडेही या पथकामार्फत लक्ष ठेवले जात आहे.

now special doctors for corona affected police in mumbai  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police : घराचा धागा पुन्हा जुळला; पोलिसांनी तरुणीला दिला मायेचा आधार

...तोपर्यंत नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही, बाळ्या मामांचा सरकारला इशारा, नेमकी अट कोणती?

Latest Marathi News Updates Live: बीडमध्ये हुंडाबळी प्रकरणात तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल

Asia Cup 2025: 'बुमराह जर UAE विरुद्ध खेळला, तर आंदोलन करेल', माजी भारतीय क्रिकेटपटूने कंल जाहीर

Yermala Crime : राष्ट्रीय महामार्गावर दिवसाढवळ्या वाहन लुटीच्या व्हायरल व्हिडीओ नंतर, स्थानिक गुन्हे शाखेला जाग

SCROLL FOR NEXT