Chembur Market 
मुंबई

चिंताजनक ! चेंबूरच्या 'या' प्रभागात 1 हजार पेक्षा अधिक कोरोनाबाधित, तर इतक्या जणांचा...

सकाळवृत्तसेवा

चेंबूर : चेंबूर येथील एम पश्चिम प्रभागात आतापर्यंत 1028 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यातील 78 जणांचा मृत्यू झाला आहे. पी.एल. लोखंडे मार्ग कोरोनाने सर्वात जास्त प्रभावित झाला आहे त्या ठिकाणी 305 जणांना कोरोनाची लागण झाली आहे असून दिवसेंदिवस या ठिकाणची रुग्ण संख्या वाढत आहे.

एम पश्चिम प्रभागाच्या हद्दीत सुरवातीला अत्यंत कमी प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळत होते. मात्र झोपडपट्टी भागात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत गेला. पी. एल. लोखंडे मार्गावर एम पश्चिम व पूर्व असे दोन प्रभाग आहेत. त्या ठिकाणी दरदिवशी आठ ते दहा जण कोरोना बाधित रुग्ण आढळतात. या ठिकाणी आतापर्यंत 205 जणांना कोरोनाची लागण झाली आहे त्यातील 132 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 19 जणांचा कोरोनाने बळी घेतला.

काल  दिवसभरात या ठिकाणी पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. या ठिकाणी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिका प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. दाटीवाटीची झोपडपट्टी असल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

number of corona infected patients in Chembur M West Division has crossed one thousand

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT