मुंबई

NCBनं अटक केलेल्या सुल्तान मिर्झाच्या मोबाईलमध्ये हायप्रोफाईल ग्राहकांचे क्रमांक

अनिश पाटील

मुंबई:  ड्रग्स तस्करीप्रकरणी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एसीबी) अटक केलेल्या सुल्तान मिर्झाच्या मोबाईलमध्ये अनेक हायप्रोफाईल ग्राहकांचे मोबाईल क्रमांक सापडले आहेत. लवकरच त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

अब्दुल वाहीद ऊर्फ सुल्तान मिर्झा याला अंधेरीतील आझाद नगर परिसरातून एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच अटक केली होती. त्याच्या इनोव्हा कारमधून 750 ग्रॅम गांजा, 75 ग्रॅम चरस, तीन ग्रॅम मेफेड्रॉन(एमडी) जप्त करण्यात आली आहे. याशिवाय एक लाख 75 हजार रुपयांची रोख रक्कमही त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे. 

वर्सोवा, लोखंडवाला आणि यारी रोड परिसरात राहणा-या काही हायप्रोफाईल व्यक्तींचे संपर्क क्रमांक त्याच्या मोबाईलमध्ये सापडले आहेत. तो त्यांना अंमली पदार्थ पुरवत असल्याची शक्तता असून त्यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासण्यात येत आहेत.

वाहिदशी संबधित काही लिंक हाती लागल्या असून त्याच्या मोबाईल सायबर फॉरेन्सिकमध्येही पाठवण्यात येणार आहे. तसेच मोबाईल क्रमांक असलेल्या  त्या व्यक्तींची लवकरच चौकशी करण्यात येणार आहे.

एनसीबीच्या कारवायांनंतरही विक्री होती सुरू

वाहिद ड्रग्सच्या काळा दुनियेत सुल्तान मिर्झा नावाने प्रसिद्ध आहे. अभिनेता अजय देवघन याच्या वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई या चित्रपटातील सुल्ताम मिर्झा या भूमिकेवरून प्रभावीत होऊन त्याने हे नाव वापरण्यास सुरूवात केली. तसेच त्याच्याप्रमाणेच आरोपी पांढरे कपडे वापरायचा. एनसीबीने बॉलीवूडशी संबंधीत ड्रग्स तस्करांविरोधात कारवाई करण्यास सुरूवात केल्यानंतर अनेक बडे विक्रेते अंडरग्राऊंड झाले होते. पण सुल्तान मिर्झाने त्याची विक्री सुरूच ठेवली होती. तो तीन ड्रग्स वितरीत करत होता.

-----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Number of high profile customer in Sultan Mirza mobile arrested by NCB

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad Politics: कराडमध्ये नगरसेवकांचे शक्तिप्रदर्शन; आमदार अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित मतदान

तारिणी मालिकेतून 'या' अभिनेत्रीची एक्झिट, सोशल मीडियावर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली...

Smartphone Ban : 'या' देशात सरकारी कर्मचाऱ्यांच्या स्मार्टफोन वापरावर बंदी, आदेश झुगारल्यास नोकरीला मुकावे लागणार, तुरुंगवासही होणार

Gokul Election Update : 'गोकुळ'च्या यादीतून ६२६ दूध संस्थांना डच्चू; ५ हजार ४७० पैकी ४ हजार ८४४ संस्थाच ठरल्या पात्र, नवी यादी जाहीर, आता कोणाचे बिघडणार गणित?

Crime News: वाळू माफियांचा रक्तरंजित हल्ला! फॉर्च्युनरमध्ये अडकवून भाजप नेत्यासह तिघांना जिवंत जाळलं

SCROLL FOR NEXT