obscene comment on social media picture of teacher case registered against school employee
obscene comment on social media picture of teacher case registered against school employee esakal
मुंबई

Mumbai Crime : शिक्षिकेचे छायाचित्र काढून सोशल मीडियावर अश्लील टिप्पणी; शाळेतील कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दखल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील नागपाडा परिसरात शाळेत शिक्षिकेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. शिक्षिकेचे छायाचित्र काढून तिच्याबद्दल अश्लील टिप्पणी करणाऱ्या शाळेतील कर्माचाऱ्याविरोधात नागपाडा पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीला नोटीस देत हजर होण्यासाठी सांगण्यात आल्याचे नागपाडा पोलिसांनी सांगितले आहे.तक्रारदार 44 वर्षीय महिला भायखळा येथील शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. 55 वर्षीय आरोपी त्याच शाळेत काम करतो. आरोपी पीडित शिक्षिकेला 2015 पासून त्रास देत होता.महिला शिक्षिकेच्या परवानगीशिवाय त्याने तिचे छायाचित्र काढले होते.

तसेच त्याने महिलेबाबत अश्लील व अपमानजनक टिप्पणीही केली. नेहमीच्या या त्रासाला कंटाळून अखेर शिक्षिकेने याप्रकरणी पोलिसाकडे तक्रार केली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात धमकावणे व अश्लील टिप्पणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. आरोपी विरोधात नागपाडा व आग्रीपाडा पोलीस ठाण्यात धमकावणे व अश्लील टिप्पणी केल्याप्रकरणी यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024 : आज सर्वत्र अक्षय तृतीयेचा उत्साह, जाणून घ्या शुभ मुहूर्त अन् महत्व

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 10 मे 2024

अग्रलेख : प्रचारासाठी दाहीदिशा...

Loksabha Election 2024 : ‘विरोधक’ आता एकाच व्यासपीठावर

Latest Marathi News Live Update : राज्यभर आज पूर्वमोसमी पावसाची शक्यता; नागपूर, भंडारा, गोंदियात गारपिटीचा इशारा

SCROLL FOR NEXT