Shivsena Esakal
मुंबई

Shivsena: CM शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे कार्यकर्ते पालव यांच्यावर अंधेरी एमआयडीसी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात झाला आहे.

काल (शनिवारी) रात्री उशिरा शिवसेना शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते अंधेरी एमआयडीसी पोलीस स्थानकामध्ये जमले होते. जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी पालव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटात मुंब्र्यातील शाखेवरून काही दिवसांपुर्वी मोठा वाद पेटला. ११ नोव्हेंबर रोजी मुंब्रा येथे दोन्ही गटांत मोठा राडा झाल्याचे दिसून आले. यावेळी उद्धव ठाकरेंनी शाखेला भेट देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांच्या विनंतीमुळे त्यांनी शाखेजवळ जाणे टाळले होते. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता.

"मुंब्र्यात फुसका बार आला आणि वाजलाच नाही. आमच्या कार्यकर्त्यांच्या फटाक्यांचा इतका आवाज होता की त्यांना यू टर्न घ्यावा लागला.", अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंवर टीका केली होती. यावरून ठाकरे गटाच्या कार्यकत्यांकडून अक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पालव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT