Skill-Development-Jobs 
मुंबई

कौशल्य विकास विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी जाहिरात, पण...

कौशल्य विकास विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी जाहिरात, पण... जाहिरातीत असलेल्या एका अटीमुळे सरकारी अधिकारी वर्गात नाराजी Officials upset over a condition in the advertisement for the post of Vice Chancellor of Skill Development University

संजीव भागवत

जाहिरातीत असलेल्या एका अटीमुळे सरकारी अधिकारी वर्गात नाराजी

मुंबई: राज्यात स्थापन करण्यात येणाऱ्या कौशल्य विकास विद्यापीठाचा शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर आता या विद्यापीठांच्या कुलगुरू पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये 20 वर्षे राज्य शासनात काम केलेल्या उमेदवाराला अर्ज करता येणार नसल्याची अट टाकण्यात आली आहे. या अटीमुळे सरकारी अधिकारी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. (Officials upset over a condition in the advertisement for the post of Vice Chancellor of Skill Development University)

राज्यात कौशल्य शिक्षणाला प्राधान्य मिळावे या उद्देशाने हे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी ‘राज्य कौशल्य विद्यापीठ अधिनियम’ संमत करण्यात आला आहे. या विद्यापीठासाठी कुलगुरू आणि कुलसचिवांची नियुक्ती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. कुलगुरू पदासाठी नामांकित शिक्षण तज्ज्ञ आणि उच्च दर्जाचे प्रशासक किंवा कौशल्य शिक्षण किंवा कौाशल्य शिक्षणावर आधारित रोजगाराभिमुखता यातील डॉक्टरेट पदवी या दोन पैकी एक निकष असणे आवश्यक आहे. याचबरोबर संबंधित उमेदवाराला किमान 20वर्षांचा केंद्र शासन, राज्य शासन, विद्यापीठ उद्योग समुहांमध्ये वरिष्ठ स्तरार काम करण्याचा अनुभव यापैकी एक अनुभव असणे आवश्यक आहे. शिवाय वयोमर्यादा 60 वर्षेपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. त्यामुळें उद्योग क्षेत्रातील अट योग्य असली तरी सरकारी कार्यालयातील अनुभवाची सक्ती का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठीही जाहिरात देण्यात आली आहे. या पदासाठी केंद्र शासन, राज्य शासन, विद्यापीठ वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर कामकाजाचा किमान 20 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदाकरीता वयोमर्यादा 55 वर्षांपेक्षा कमी राहील असेही या जाहिरातीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

(संपादन- विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT