mumbai local train sakal
मुंबई

Mumbai Local Train : ओएचई वायर तुटल्याने पश्चिम रेल्वे दीड तास ठप्प; १८ लोकल फेऱ्या रद्द!

१८ लोकल फेऱ्या रद्द, शंभर लोकल फेऱ्यांना लेटमार्क !

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या दहिसर ते बोरिवली स्थानकादरम्यान अप जलद मार्गांवरील ओव्हर हेड वायर बुधवारी सकाळी तूटल्याने चर्चगेटकडे जाणारी वाहतूक ऐन गर्दीच्या वेळी ठप्प झाली होती. त्यामुळे तब्बल १८ लोकल फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की पश्चिम रेल्वेवर आली आहे. लोकल सेवांच्या वेळापत्रकारांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी १० वाजून २ मिनिटांच्या सुमारास दहिसर ते बोरिवली दरम्यान अप जलद मार्गावरील ओव्हर हेड वायर तुटली. ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकलला होणारा विदयुत पुरवठा खंडित झाला. तसेच ओव्हरहेड वायर एसी लोकलच्या पेंटाग्राफमध्ये अडकून पडला होता.

त्यामुळे चर्चगेट दिशेने जाणाऱ्या लोकल एकामागेएक जागीच खोळंबल्या. या घटनेमुळे एसी लोकसह तीन लोकल रखडल्या होत्या. चर्चगेटकडे जाणारी अप जलद मार्गावरील वाहतूक अप धीम्या मार्गांवरून वळविण्यात आली. त्यामुळे अप धीम्या मार्गावरील लोकलचे वेळापत्रक कोलमडले. याचा फटका सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशाना बसला. तसेच मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मेल- एक्सप्रेस गाडयांना मोठा फटका बसला आहे.

दीड तासानंतर बिघाड दुरुस्त

या घटनेची माहिती मिळताच पश्चिम रेल्वेचे अभियांत्रीकी पथक ओव्हर हेड वायर दुरुस्तीची वॅगन घेऊन घटना स्थळी पोहचले. एसी लोकलच्या पेन्टाग्राफमध्ये अडकलेल्या ओव्हर हेड वायर काढण्यात आला. त्यानंतर तब्बल दीड तासानंतर तुटलेला ओव्हर वायर जोडण्यात आला. सकाळी ११ वाजून ३२ मिनिटांनी अप जलद मार्गांवरील लोकल वाहतूक सुरु करण्यात आली. मात्र, तेव्हापर्यत प्रवाशांना प्रचंड हाल झाले आहे.

एसी लोकल अडकली

या घटनेमुळे एसी लोकलमधील विद्युत पुरवठा बंद झाल्याने एसी लोकलमध्ये प्रवाशांच्या श्वास गुदमरत होता. एसी लोकलमध्ये असणाऱ्या सर्व प्रवाशांना उष्णतेचा त्रास होत होता. प्रवाशांच्या आरडाओरडनंतर एसी लोकलचे दार उघडण्यात आले. त्यानंतर प्रवाशांनी रेल्वे रुळावरून चालत जात दुसरे रेल्वे स्थानक गाठले आहे. त्यामुळे एसी लोकलच्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT