मुंबई

देशात कोरोना लढ्यासाठी ओला आली धावून... वाचा बातमी सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ओला कंपनीने मुंबईसह देशातील 15 प्रमुख शहरांमध्‍ये आपात्कालीन सेवा नुकतीच सुरू केली आहे. ओला आता देशातील नागरिकांना किमान विलंबासह आवश्‍यक रुग्णांना वैद्यकीय वाहतूकीची सुविधा देणार आहे. मुंबई, बेंगळुरू, गुरूग्राम, विझाग, नाशिक, वाराणसी, इंदौर, भोपाळ, अमृतसर, लुधियाना, जालंधर, पटियाला, मोहाली, रुरकेला व भुवनेश्‍वर या शहरात ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. 

ओलाकडून आपात्कालीन सेवेच्या माध्यमातून नियोजित तपासणी, डायलिसिस आणि केमोथेरपीसारख्‍या सर्व नॉन-कोविड रुग्णांना रुग्णालयांपर्यंत जाण्यासाठी प्रवासी सुविधा दिली जात आहे. त्यामध्ये ओला अॅपच्या माध्यमातूनच घरापासून ते रुग्णालयापर्यंत जाण्या-येण्यासाठी प्रवाशांना ओलाची कॅब बुकिंग करता येणार आहे. त्यासाठी विविध राज्‍य सरकारांसोबत चर्चा करून सोशल डिस्‍टन्सिंग व सुरक्षिततेबाबत काळजी घेतल्या जात आहे. 

ओलाने मुंबईतील 200 हून अधिक रुग्णालयांचा समावेश अॅपमध्‍ये केला आहे. ओला अॅपमधूनच रुग्णाला संबंधित रुग्णालयासाठी पिकअप आणि ड्रॉप निवडता येणार आहे. आरोग्‍य मंत्रालयाच्‍या मार्गदर्शकतत्त्‍वांनुसार योग्‍य स्‍वच्‍छता विषयक उपायांचे पालन करणा-या खास प्रशिक्षित चालक या कॅब्‍स चालवणार आहे. नुकतेच सुरू करण्‍यात आलेल्‍या ओला आपात्कालीन सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ओलाचे प्रवक्‍ता आनंद सुब्रमण्‍यन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्रकरण! सुनेत्रा पवारांनी उचललं कठोर पाऊल; आढावा बैठकीत निर्देश

Pahalgam Tourist Places Reopen : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बंद केलेली १४ पर्यटनस्थळे पुन्हा सुरू होणार!

Latest Marathi News Update : भाजपला उघडे पडणारच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

SC On Pre Marriage: लग्नापूर्वी कुणावरही विश्वास ठेऊ नका; नातेसंबंधांत सजगता महत्त्वाची, न्यायालयाने का व्यक्त केली चिंता?

Pune News : महापालिकेत समाविष्ट २३ गावांसाठी दोन हजार कोटीचे कर्ज घेण्याची तयारी

SCROLL FOR NEXT