Arrested Taxi Driver
Arrested Taxi Driver Sakal
मुंबई

मुंबईत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या ओला टॅक्सी चालकाला अटक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - विलेपार्ले मुंबई विमानतळावरून ऑनलाईन ओला टॅक्सी कॅब बुक करून रॉयल पाम आरे कॉलनी येथे घरी येत असतांना (ता. 25) रोजी कॅब चालकांकडून 15 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. बुधवारी सकाळी 10 च्या सुमारास ही घटना घडली असून, प्रवासात झालेली घटना मुलीने अपल्या घरी सांगितल्यानंतर तात्काळ आरे कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आता ओला टॅक्सी कॅब चालक मुरारी कुमार सिंह अटक करण्यात आली आहे.

अल्पवयीन विद्यार्थिनीने टॅक्सी पकडल्यानंतर रॉयल पाम सोसायटीत पोहोचले तेव्हा टॅक्सीचे भाडे भरण्यासाठी विद्यार्थिनीकडे सुटे पैसे नव्हते, विद्यार्थिनीने ड्रायव्हरला सुट्टे पैसे घेऊन येते असे सांगितले. त्यावर ड्रायव्हर मुरारी सिंग अल्पवयीन मुलीला अश्लिल हावभाव केले, पीडितेने संपूर्ण घटना कुटुंबियांना सांगितली, त्यानंतर जवळचे आरे पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. मुरारी कडून विद्यार्थिनीशी जबरदस्तीने मैत्री करण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र त्या विद्यार्थिनीने नकार दिला.

या प्रकरणाची आरे पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आरोपी मुरारी कुमार सिंग (29) याला भगतसिंग नगर गोरेगाव पश्चिम येथून सीसीटीव्ही फुटेजद्वारे अटक केली मुरारीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानंतर आता आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी मुरारी सिंगला 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचे आरे पोलीस स्टेशनचे पीएसआय सचिन पांचाळ यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT