Ola
Ola 
मुंबई

ओला, उबरच्या चालक-मालकांचा संप स्थगित

सकाळवृत्तसेवा

मुंबई - ओला, उबर चालक-मालकांनी रविवारी मध्यरात्री अघोषित संप पुकारून सोमवारी विधान भवनावर आक्रोश मोर्चा काढला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर यासंबंधित बैठक घेऊन प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिल्याने संप स्थगित करण्यात आला. रविवारी मध्यरात्रीपासून मात्र प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. 

दिवाळीपूर्वी ओला, उबर चालक-मालकांनी १२ दिवस संप केला होता. दरम्यान, १५ नोव्हेंबरपर्यंत प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्यात येणार असल्याचे आश्‍वासन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले होते. त्यानंतर अजून आश्‍वासनांची पूर्तता होत नसल्याने अखेर चालक-मालकांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह आक्रोश मोर्चाची भूमिका घेतली. दरम्यान, चालक-मालकांसह शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर लवकरच कंपन्यांचे अधिकारी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून प्रश्‍न मार्गी लावला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन दिले. त्यानंतर संप तात्पुरता स्थगित करण्यात आला.

संपामुळे प्रवाशांचे हाल
मुंबई, नवी मुंबई, ठाणे यासह इतर भागांतून ओला, उबरने प्रवास करणाऱ्यांना सोमवारी मनस्ताप सहन करावा लागला. त्यातच मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळित झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली होती. ओला, उबर सेवा ठप्प असल्याने अनेक ठिकाणी प्रवाशांना ज्यादा प्रवास भाडे देऊन प्रवास करावा लागल्याच्या घटना घडल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT