Corona Vaccine Sakal media
मुंबई

'या' दिवसापासून अंथरुणास खिळलेल्या नागरिकांचे कोविड लसीकरण

के-पूर्व विभागातून प्रारंभ, प्रायोगिक तत्त्वावर पालिकेकडून लसीकरण

भाग्यश्री भुवड

मुंबई : अंथरुणाला खिळून असलेल्या नागरिकांच्या कोविड 19 लसीकरणाला (Corona vaccination) 30 जुलैपासून सुरूवात होणार आहे. या रुग्णांसाठी (Corona patients) कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण करण्याची कार्यवाही के पूर्व प्रभागापासून प्रायोगिक तत्त्वावर शुक्रवारपासून सुरु होणार आहे. त्यासाठी प्रोजेक्ट मुंबई (Project Mumbai) या बिगर शासकीय सेवाभावी संस्थेचे देखील सहकार्य लाभणार आहे. ( Old age people who are not capable for walk their vaccination starts from thirty july-nss91)

कोविड- 19 विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सह मुंबई महानगरपालिका देखील प्रयत्नशील आहे. वय किंवा इतर कारणांनी शारीरिक हालचालींवर मर्यादा येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह इन लसीकरणा सारखे उपक्रमही महानगरपालिकेने राबवले आहेत. असे असले तरी, आजारपणासह शारीरिक / वैद्यकीय कारणांनी अंथरूणास खिळून आहेत, अशा नागरिकांना लसीकरण केंद्रांवर येणे शक्य होत नाही. त्यांची अडचण लक्षात घेता, अश्या व्यक्तींना त्यांच्या घरीच जाऊन कोविड लस देण्यासंदर्भात मागणी करण्यात येत होती.

महाराष्ट्र राज्य शासनाने देखील संपूर्ण राज्यात स्थानिक प्राधिकरणांना या संदर्भात नागरिकांकडून माहिती संकलित करुन कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने, ज्यांच्या घरात अंथरुणास खिळून असणारे व्यक्ती आहेत व ज्यांना अशा व्यक्तीचे कोविड लसीकरण करुन घ्यावयाचे आहे, अशा व्यक्तींची नावे, वय, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणास खिळून असण्याचे कारण इत्यादी माहिती covidvacc2bedridden@gmail.com या ईमेल आयडीवर मागविण्यात आली आहे. आतापर्यंत 4 हजार 466 व्यक्तींची नावे नोंद झाली आहेत.

या बाबी महत्त्वाच्या

अंथरुणाला खिळलेल्या ज्या व्यक्तीचे लसीकरण करावयाचे आहे, अशी व्यक्ती किमान 6 महिने अंथरुणास खिळून राहणार असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्रं देण्यासह लस घेण्यासाठी अशा व्यक्तींचे संमतीपत्रं संबंधित व्यक्ती - नातेवाईक यांनी प्रशासनाला सादर करणे आवश्यक असेल. तसेच, अशा व्यक्तींना कोवॅक्सिन ही लस देण्याचे निर्देश तज्ज्ञांच्या समितीने दिले असून त्यानुसार कोवॅक्सिन ही लस देण्यात येईल. तज्ज्ञ व्यक्तींच्या उपस्थितीत लसीकरण करुन त्याबाबत आवश्यक ती सर्व प्रक्रिया पाळण्यात येईल. प्रायोगिक तत्त्वावरील लसीकरण सुरु झाल्यानंतर, कोणकोणत्या बाबी अशा कार्यवाहीमध्ये समाविष्ट कराव्या लागतील, याचा विचार करुन पुढील टप्पा हाती घेण्यात येणार आहे असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction live : लिलावापूर्वी BCCI ची 'गुगली'! परदेशी खेळाडूंसाठी निश्चित केली Salary Cap; जाणून घ्या बदललेला नियम

U19 Asia Cup: १७ चौकार, ९ षटकार अन् डबल सेंच्युरी! भारताच्या अभिज्ञान कुंडूने रचला इतिहास, कोणालाच न जमलेला केला पराक्रम

Jio Recharge Offer : महिन्याचा रीचार्ज फक्त ₹103! मोफत OTT आणि AI सब्स्क्रिप्शन; Jio चे Happy New Year साठी 3 जबरदस्त प्लॅन

Latest Marathi News Live Update : लातूर तालुक्यात डोंगर पोखरून जमिनीची चाळण; तहसीलदारांचे दुर्लक्ष, मंत्री बावनकुळे आज लातूर दौऱ्यावर, कारवाई होणार का?

Chandrapur : माणुसकीला काळिमा फासणारी घटना! कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला विकायला लावली किडनी; सावकारकीचा अमानवी चेहरा समोर..

SCROLL FOR NEXT