मुंबई

 महाड रायगड मार्गावर भरधाव कारच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

सुनिल पाटकर

महाड - महाड रायगड मार्गावर  लाडवली जवळ भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या तरुणाने पादचारी वृद्धास धडक दिल्याने झालेल्या अपघातात या वृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सदर तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाड जवळील लाडवली गावानजीक लाडवली गावातील अशोक नारायण धोत्रे वय 55 हे कामाच्या शोधात गोंडाळे येथे जात असताना मागून येणाऱ्या आय टेन कारची जोरदार धडक लागली. कार चालक दीप नवीन भानुशाली वय 19 याने त्याच्या ताब्यातील कार क्रमांक एम.एच. O5 ए एक्स 94O9 वेगाने चालवून रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने कार चालक दीप भानुशाली याच्यावर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात सोमवारी रात्री साडेसात  वाजण्याच्या सुमारास घडला.. अधिक तपास पोलीस नाईक एस.एल.नाईक हे करीत आहेत.

An old man died in a car crash on Mahad Raigad road

--------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT