mumbai crime news
mumbai crime news 
मुंबई

आधी पत्नी.. मग मुलीचा गळा चिरला! शेवटी मृतदेहांपाशी बसून राहिला

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतील जोगेश्वरीच्या मेघवाडी परिसरात ८९ वर्षांच्या वृद्धाने पत्नी आणि मुलीचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरीपासून जवळ असणाऱ्या प्रेम संदेश सोसायटीत हा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी शेर-ए -पंजाब नावाची कॉलनी आहे. त्या ठिकाणी हा खूनाचा थरार उघडकीस आला. (Mumbai Crime News)

हत्या केल्यानंतर आरोपी बराच वेळ दोघींच्या मृतदेहाजवळ बसून होता. पत्नी आणि मुलीच्या आजारपणाला कंटाळून त्याने हे कृत्य केल्याचं पोलिसांना सांगितलं. जसबीर कौर गंडलोक (वय ८१) असे त्याच्या पत्नीचं नाव आहे.

तर कमलजित कौर गंडलोक (वय ५५) असे मृत मुलीचे नाव आहे. या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असून पती पुरषोत्तमसिंग गंडलोक याला अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. यानंतर जागेचा पंचनामा करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

वयोमनानुसार जसबीरकौर गंडलोक या आजारी असल्याने मागील १० वर्षांपासून अंथरूणाला खिळून असतात. तर मुलगी कमलजित कौर ही जन्मजात गतिमंद असल्याने त्यांच्यासोबतच राहते. मागील अनेक वर्ष पुरूषोत्तम या दोघींची व्यवस्थित काळजी घेत होते. त्याची औषध आणि इतर लागणाऱ्या वस्तूही त्यांंना देत होते. मात्र दोघींसोबत पुरुषोत्तम याचंही वय वाढत चाललं होतं. दिवसेंदिवस त्यांनाही दोघींची सेवा करणं तितकसं जमत नव्हतं.

वाढलेल्या वयामुळे दोघींनाही विविध आजार, व्याधी या वाढत होत्या. त्यामुळे अंथरुणतील दोघींची तळमळ पुरषोत्तम यांच्याकडून पाहिली जात नव्हती. याच मनस्थितीतून रविवारी रात्री पुरषोत्तम यांनी दोघींची रात्री गळा चिरून हत्या केली. या घटनेची माहिती मेघवाडी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुरषोत्तम यांना ताब्यात घेतले. पुरषोत्तम याच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्याना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई हायवेवर वाहतूक कोंडी, वाहतूक संथ गतीने

SCROLL FOR NEXT