Mumbai Corona sakal Media
मुंबई

मुंबईकरांनो! 16 डिसेंबरपासून नवे निर्बंध; वाचा नवी नियमावली

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात देखील ऑमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात जास्त रुग्ण आढळून येतान दिसत आहेत. मुंबई परिसरामध्ये ओमिक्रॉनचे चार रुग्ण सापडल्याने आता मुंबई पोलिसांनी नवे निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे वर्ष संपण्याचा मार्गावर असताना 31 डिसेंबर रोजी पार्टीच्या निमित्ताने अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मुंबई पोलिसांनी नियमावलीचं नवं परिपत्रक काढलं आहे. हे निर्बंध 16 डिसेंबर ते 31 डिसेंबर या दरम्यानच्याच काळात लागू असणार आहेत. यानुसार, सर्व मुंबईकरांना कोरोना नियमावलीचं पालन करणं अनिवार्य असणार आहे.

काय आहे मुंबई पोलिसांच्या परिपत्रकात?

  • आयोजित कार्यक्रमातील, सेवेशी निगडीत असणारे आयोजक, सहभागी, अभ्यागत, पाहुणे, ग्राहक या सर्वांचेच पूर्णपणे लसीकरण झालेले असणे अनिवार्य आहे.

  • कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, कार्यक्रम, मेळावे याठिकाणी आलेल्या व्यक्तींचे पूर्ण लसीकरण झालेले हवे. अभ्यागत, ग्राहक यांचेही लसीकरण झाले पाहिजे.

  • मुंबईतील सर्व सार्वजनिक वाहतूक सेवेने प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण झाले असावे. पूर्ण लसीकरण न झालेल्या व्यक्तींना प्रवास करण्यावर बंदी असणार आहे.

  • महाराष्ट्रात येणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे पूर्ण लसीकरण अथवा ७२ तासांपूर्वी करण्यात आलेली आरटी पीसीआर चाचणीच वैध असणार आहे.

  • कोणत्याही कार्यक्रम, स्पर्धा, मेळावे, समारंभ याठिकाणी क्षमतेच्या 50 टक्केच लोक उपस्थित राहू शकतात. जर एकूण उपस्थित लोकांची संख्या १ हजारापेक्षा जास्त असल्यास स्थानिक प्राधिकरणाला याबाबत माहिती द्यावी लागणार आहे.

  • बंदीस्त सभागृह, बंदिस्त रेस्टॉरंट, हॉलमध्ये 50% क्षमतेपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही.

  • मोकळ्या जागी 25% क्षमतेपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही.

  • 31 डिसेंबर आणि ख्रिसमस निमीत्त होणा-या पार्ट्यांवर नजर ठेवण्याकरता प्रत्येक वॉर्ड मध्ये महापालिकेची 4 पथकं तैनात असतील.

  • नियम मोडणाऱ्या पार्ट्या आढळल्यास संबंधित रेस्टॉरंट मालक, हॉटेलमालक यांच्यावरही नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT