Aurangabad Omicron Positive I want vacation I mean sakal
मुंबई

ही तर तिसरी लाट? रुग्णवाढीचं प्रमाण आधीपेक्षा जास्त

Covid19 Third Wave : पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत वेगानं पसरतोय कोरोना

सुधीर काकडे

ओमिक्रॉनच्या (Omicron) पार्श्वभूमीवर सध्या देशात सुरक्षिततेच्या उपयांची अंमलबजावणी करण्याचे आदेश केंद्र सरकारने (Central Government) राज्यांना दिले आहेत. कोरोनाच्या लाटेतून बाहेर पडत असतानाच सर्व जगासमोर आज ओमिक्रॉनचं सावट उभं आहे. त्यातच तिसऱ्या लाटेत कोरोना बाधित होण्याचं प्रमाण देखील वाढल्याचं दिसतं आहे.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत या तिसरी लाट अर्थात ओमिक्रॉन संसर्गाबद्दल तज्ञांकडून वारंवार भिती व्यक्त केली जाते आहे. त्यातच आता मुंबईमधील आकडेवारीवरून काही धक्कादाय निष्कर्ष समोर आले आहेत. मुंबईमध्ये पहिल्या लाटेत १२ दिवसांत ७०६ ते १३६७ लोक बाधित होत होते. त्यानंतर दुसऱ्या लाटेत २० दिवसांत ६८३ ते १३२५ रुग्ण बाधित होत होते. तर आता तिसऱ्या लाटेत फक्त चार दिवसांतच ६८३ ते १३२५ रुग्ण बाधित होता आहेत. त्यामुळे ओमिक्रॉन संसर्गाचा वेग जास्त असल्याचं समोर येत आहे.

दरम्यान, ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. याअंतर्गत पालिकेने मेट्रो सिटी मुंबईमध्ये कम्युनिटी सर्विलांस सुरू केले आहे. कम्युनिटी सर्विलांसद्वारे, शहरांमध्ये कोविडने ग्रस्त असलेल्या कोणत्याही रुग्णाचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जात आहेत. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, जे नवीन रुग्ण सापडत आहेत ते कोणत्या व्हेरिअंटने ग्रस्त आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

तिथे जाऊन संसार... विदेशात सेटल व्हायला का तयार नाहीये उमेश कामत? प्रियाला म्हणाला- तुला जायचं असेल तर जा पण...

Latest Marathi News Live Update : हवामान खात्याकडून रायगडला अवकाळी पावसाचा इशारा

IPL सुरू असतानाच दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूची अचानक निवृत्तीची घोषणा, वार्षिक करारातून वगळ्यानंतर घेतला निर्णय; म्हणाला...

Iran Hormuz Strait Toll : इराणने हॉर्मूझच्या सामुद्रधुनीवर सुरु केला टोलनाका; एक जहाज सोडण्याचे घेत आहे तब्बल 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT