flight sakal
मुंबई

Omicron: दक्षिण आफ्रिकेच्या विमान सेवेबद्दल BMC चं स्पष्टीकरण

आगामी नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून अनेक नागरिक भारतात येण्याची शक्यता आहे.

सुमीत सावंत, मुंबई

मुंबई: दक्षिण आफ्रिकेत (South africa) आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंट (New variant) मुळे विमानसेवा (Flight service) बंद करण्याची कोणतेही मागणी केलेली नाही, असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे. पण दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाइन करण्याचा पालिकेचा विचार आहे. आगामी नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून अनेक नागरिक भारतात येण्याची शक्यता आहे. युरोपीय देशांमध्ये करोनाचा (Corona) उद्रेक वाढत असताना तेथून येणारे प्रवासी बाधित असल्याचे आढळल्यास त्यांच्या जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्या (जिनोम सिक्वेन्सिंग) करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

तसेच या देशांमधील जिनोम सिक्वेन्सिंग अहवालही देण्याची मागणी करोना कृती दलाकडे केली आहे. आगामी नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून अनेक नागरिक भारतात येण्याची शक्यता आहे तसेच सध्या रशिया, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, जर्मनी या देशांमध्ये पुन्हा एकदा करोनाचा फैलाव वेगाने होत आहे.

या देशांमध्ये करोनाचे नवा उत्परिवर्तित प्रकार आढळल्यास त्यावर देखरेख ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे सध्या तेथे आढळणाऱ्या करोना विषाणूच्या उत्परावर्तित रुपाची माहिती मिळणे गरजेचे आहे. यासाठी या देशांमधील जनुकीय क्रमनिर्धारण अहवाल मागविण्याची मागणी पालिकेने राज्य करोना कृती दलाकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT