Mumbai local  esakal
मुंबई

Mumbai Local : दसऱ्यादिवशी लोकलचे रविवार वेळापत्रक ! मुंबईकरांचा गर्दीशी सामना, सणासुदीच्या दिवशी प्रचंड हाल

CD

मुंबई, ता. २४ ः ठाकरे आणि शिंदे गटाचा मेळावा आणि त्यातच दसऱ्यानिमित्ताने खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना आज लोकल गर्दीचा सामना करावा लागला. दसऱ्यानिमित्त शासकीय सुट्टी असल्याने रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवार वेळापत्रकानुसार लोकल चालविण्यात आली; परंतु त्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले.

दसऱ्यानिमित्त मंगळवारी मोठ्‍या संख्येने मुंबईकर खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. त्यातच आझाद मैदान आणि शिवाजी पार्कमध्ये ठाकरे व शिंदे गटाच्या दसरा मेळावा होणार असल्याने कार्यकर्त्यांची संख्याही मोठी होती. सार्वजनिक सुट्टीमुळे मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे रविवार वेळापत्रकानुसार लोकल चालविल्याने मोठी गर्दी झाली होती.

तसेच लोकलची संख्या कमी असल्याने प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे दादर, कुर्ला, वांद्रे, अंधेरी,घाटकोपर, ठाणे, डोबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी दिसून आली. रेल्वेने सणासुदीत तरीही सुट्टीच्या वेळापत्रकानुसार लोकल चालविल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ,हार्बर मार्ग,ट्रान्स हार्बर मार्गावर मंगळवारी रविवार वेळापत्रकाप्रमाणे लोकल चालविण्यात आल्या आहेत. सोमवार ते शुक्रवार मध्य़ रेल्वेच्या मुख्य मार्गावर दिवसभऱात ८९४,हार्बर मार्गावर ६०८ तर ट्रान्स हार्बर मार्गावर २६२ लोकल , तर नेरुळ खारकोपर मार्गावर ४० लोकल धावतात.म्हणजेत दिवसभऱात एक १८१० फेऱ्या होतात. रविवार वेळापत्रकात मुख्य मार्गावर ६८७,हार्बर मार्गावर ४९९ तर ट्रान्स हार्बर मार्गावर २४६ लोकल चालविण्यात येतात. म्हणजेच रविवार वेळापत्रकात लोकलच्या ३३६ फेऱ्या कमी असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ठाकरे बंधू एकटवले! ४ ऑक्टोबरला 'जनमोर्चा'ची घोषणा; नेमका मुद्दा काय?

Virat Kohli Retirement: २०२७ चा वर्ल्ड कप हा माझा भारतासाठी शेवटचा...; विराट कोहलीचे निवृत्तीचे संकेत, रोहित शर्माही म्हणाला की...

Amazon Great Indian Festival sale 2026: स्मार्टफोन्सवर ऑफरचा पाऊस; मिळणार भरघोस डिस्काउंट! पाहा कोणत्या फोनची किंमत किती?

Incognito मध्ये सर्च केल्यावर हिस्ट्री दिसत नाही; पण ‘या’ लोकांना तुमची माहिती कळू शकते

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

SCROLL FOR NEXT