मुंबई

शरद पवार पुन्हा सोनियांच्या भेटीला, भेटीमागचं समीकरण काय ?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई :  राज्यातील राजकीय घडामोडींबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची लवकरच नवी दिल्ली येथे भेट घेणार आहेत. दरम्यान, येत्या मंगळवारी (ता. 12) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक मुंबईत बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत पुढील रणनीती ठरणार असल्याचे सांगितले जाते.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पंधरवडा उलटला असला तरीही नवीन स्थापन सरकार झालेले नाही. तेराव्या विधानसभेचा कालावधी शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता संपला असून, देवेंद्र फडणवीस हे प्रभारी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पाहत आहेत. अशा राजकीय अस्थिरतेत राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपला ते निमंत्रण देणार आहेत का, याविषयी तर्कवितर्क लढवले जात असताना येत्या मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या 54 आमदारांना मुंबईत बैठकीला बोलावले आहे. 
राज्यातील घडामोडी पाहता शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसने आपल्या आमदारांवर बारीक लक्ष ठेवले आहे.

सत्ता स्थापन होताना भाजप घोडेबाजार करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, म्हणून ही खबरदारी घेतली आहे. कॉंग्रेसने आपले आमदार जयपूरला पाठवले आहेत, तर शिवसेनेने मुंबईतच सुरक्षित ठिकाणी रवाना केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुढील रणनीती ठरवली जाणार आहे.

आता शरद पवार हे पुन्हा सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचे समजते. या भेटीत राज्यातील घडामोडींबाबत ते चर्चा करणार असून, संभाव्य सत्ता स्थापनेबाबत सोनिया यांच्याशी सल्लामसलत करतील, असे सांगण्यात येते.

WebTitle : once again sharad pawar to meet sonia gandhi this might be reason

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : एरंडोलमध्ये ८२ सार्वजनिक गणेश मंडळांकडून उत्साहात गणरायाची स्थापना

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT