बडा कब्रस्तान  file photo
मुंबई

मरीन लाइन्सच्या बडा कब्रस्तानमध्ये १६ दिवसात १४५ दफनविधी

मृत्यूचे प्रमाण एकाएकी वाढले

दीनानाथ परब

मुंबई: बडा कब्रस्तान ही देशातील एक मोठी दफनभूमी आहे. मरीन लाइन्स येथे सात एकरमध्ये पसरलेल्या बडा कब्रस्तान येथे मुस्लिम समाजातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर दफन विधी केले जातात. जुमा मशीद ऑफ बॉम्बे ट्रस्टकडून या दफनभूमीचे व्यवस्थापन केले जाते. कोविडमुळे मार्चच्या तुलनेत एप्रिल महिन्यात बडा कब्रस्तान येथे दफनविधीचे प्रमाण वाढले आहे.

एक एप्रिल ते १६ एप्रिल या कालावधीत बडा कब्रस्तानमध्ये १४५ मृतदेहांचे दफन करण्यात आले. यातले ६७ दफनविधी हे कोविड रुग्णांचे होते. मार्च महिन्यात बडा कब्रस्तानमध्ये १३४ दफनविधी करण्यात आले. त्यावेळी २९ मृत्यू हे कोविडशी संबंधित होते. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.

'मागच्या आठवड्यात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे' असे जुमा मशीद ऑफ बॉम्बे ट्रस्टचे अध्यक्ष शोएब खातिब म्हणाले. "१३ एप्रिल ते १७ एप्रिल या चार दिवसात ५० मृतदेहांचे दफन करण्यात आले. त्यात कोविडच्या आजाराने मरण पावलेले २४ जण होते. बडा कब्रस्तानमध्ये कोविडच्या आजाराने मृत्यू झाल्यानंतर होणाऱ्या दफनविधीचे प्रमाण ५० टक्क्यापेक्षा जास्त आहे" असे शोएब खातिब म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT