मुंबई

ग्रॅंट रोड येथील इमारतीच्या आगीत एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: ग्रॅंट रोड येथील आदित्य ऑर्केड इमारतीला लागलेल्या भीषण आगीत उत्तम कुमार (वय २२) या तरुणाचा मृत्यू झाला; तर आगीच्या धुराने पाच जण गुदमरल्याने त्यांना जे. जे. आणि नायर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पालिका अग्निशमन दलाने दिली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी दुपारी १२ च्या सुमारास शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.

ग्रॅंट रोड येथील गोवालिया टॅंकजवळील चारमजली आदित्य ऑर्केड इमारतीला पहाटे ६ च्या सुमारास आग लागली. काही वेळातच या आगीने भीषण रूप धारण केले. लाकडी सामान, विद्युत साहित्य आणि ज्वलनशील पदार्थांनी पेट घेतला. यामुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले; मात्र आगीचा दाह आणि धुरामुळे बचावकार्यात अडचणी आल्या. तोपर्यंत अनेकांना धुराचा त्रास झाला. त्यामुळे इमारतीच्या लोखंडी ग्रील कापून अनेकांची सुटका करण्यात आली. दिलीप चौधरी (वय ४०), अशोक चौधरी (वय २३), भारत चौधरी (वय २३) यांना धुराचा त्रास झाल्याने जे. जे. रुग्णालयात आणि मेमनवाडा अग्निशमन केंद्राचे सुधान गोरे आणि भायखळा अग्निशमन केंद्राचे नंदकुमार वायल यांच्या डाव्या हाताला मार लागल्याने त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात घटनेत उत्तमकुमार या २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. 

दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी १० फायर इंजिन, वॉटर टॅंकर यांच्या साह्याने दुपारी १२ वाजता आगीवर नियंत्रण मिळवले. आग कशामुळे लागली याबाबत अद्याप समजू शकलेले नाही. स्थानिक पोलिस, अग्निशमन दलाचे अधिकारी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT