Murder sakal
मुंबई

Mumbai Crime : जेवणाच्या पार्सलवरून झालेल्या वादातून एकाची हत्या

जेवणाच्या पार्सलवरून झालेल्या वादातून चेंबूरमध्ये एका 22 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - जेवणाच्या पार्सलवरून झालेल्या वादातून चेंबूरमध्ये एका 22 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 22 वर्षीय अनिल रणदिवे नामक मृत तरुण चेंबूरमधील सम्राट अशोक नगरचा रहिवासी होता.

याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी रितीक बजाज व हर्षद क्लोड्रा या दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील रणदिवे याचा सजावटी वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय आहे

मिळालेल्या माहितीनुसार पिडीत अनिल रणदिवे चेंबूर परिसरातील सन्निधी रेस्टॉरंटमध्ये जेवणाचे पार्सल आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी तेथे आरोपी रितीक बजाज व हर्षद क्लोड्रा हेही उपस्थित होते. जेवणाचे पार्सल पहिला कोण घेणार या वादातून दोन्ही आरोपींनी अनिलला मारहाण करण्यास सुरुवात केली.

आरोपींनी केलेल्या मारहाणीत अनिलच्या तोंडावर, डोक्यावर व छातींवर गंभीर दुखापत झाली. मारहाणीमुळे अनिल बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. अनिलला तत्काळ शताब्दी रुग्णालयात दाखल केले असता तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. चेंबूर पोलिसांनी याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT