Dharavi in Mumbai sakal media
मुंबई

धारावीत महापालिकेची विशेष लसीकरण मोहिम, 'हा' आहे BMC चा टार्गेट

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईतील (Mumbai) सर्वात मोठ्या झोपडपट्टी असलेल्या धारावीत (Dharavi) लसीकरण मोहीमेला (Vaccination Drive) गती देण्यासाठी पालिकेच्या जी -उत्तर विभागाने (G-North) विशेष लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमे अंतर्गत एक लाख धारावीकरांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट असल्याचे जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर (Kiran Dighavkar) यांनी सांगितले. (One lac people from dharavi corona vaccination target of BMC-nss91)

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव त्यानंतर एप्रिल महिन्यात धारावीत कोरोनाचा शिरकाव झाला. धारावीत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर कोरोनाचा झपाट्याने फैलाव होणार अशी भीती व्यक्त केली जात होती. परंतु योग्य उपचार पद्धती यामुळे धारावीत कोरोनाची पहिली व दुसरी लाट थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. तर तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता लसीकरण मोहीमेला गती देण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाने सुरु केला आहे.

धारावीतील एक लाख लोकांना एका महिन्यात लस देण्याचे उद्दीष्ट ठेवत लसीकरण मोहीम राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सीएसआर फंडाअंतर्गत सिटीबँकने एक लाख लोकांना दोन्ही डोस देत कोरोनापासून सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. या कामात पालिका पूर्ण सहकार्य करणार आहे. पालिकेकडून त्यांना लसीकरणासाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. यासह, महापालिकेने स्वतः लाभार्थ्यांची नोंदणी करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दिघावकर यांनी साांगितले की, मंगळवारी पहिल्या दिवशी 500 लोकांना कोरोनाची पहिला डोस देण्यात आला आहे. दररोज एका केंद्रातून 1500 ते 3000 नागरिकांना कोरोना लस दिली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Nagpur Vidhan Bhavan Project: नागपूर विधानभवनाचे रूपडे पालटणार; १,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही सभागृह येणार एकाच छताखाली

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

Maharashtra Rain: पालघरमध्ये मुसळधार! 24 तासांत 134 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

Navi Mumbai: बटाटावड्यात आढळली अळी, नवी मुंबई महापालिकेच्या भोजनालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT