baby 
मुंबई

 अरे वाह! 1 महिना 6 दिवसांच्या बाळाने केली कोरोनावर मात; डॉक्टरांनी टाळ्या वाजवत दिला निरोप

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत एका महिन्याच्या बाळाने कोविडवर यशस्वी मात केली आहे. सायन रुग्णालयात कोरोनावरील उपचार घेत असणार्या या बाळाचा आज रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

19 मे ला या बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फिट आणि ताप येण्याच्या कारणासाठी हे बाळ सायन रुग्णालयात आपल्या आईसोबत उपचारांसाठी दाखल झाले होते. ताप येत होता म्हणून काही दिवसांनी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळेस त्या चाचणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. तापावरील उपचार दिल्यानंतर आज या बाळाची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आली. त्यानूसार, त्याला डिस्चार्ज देण्यात आला. 

डॉक्टरांनी टाळ्या वाजवून दिला निरोप:

सायन रुग्णालयात एक महिन्याच्या बाळावर उपचार सुरू होते. त्याचा रिपोर्ट आज निगेटिव्ह आला. बाळाला रुग्णालयातुन डिस्चार्ज देताना डॉक्टरांनी टाळ्या वाजवत त्याच्या उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिवाय, यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्या बाळाचे आणि बाळाचे अभिनंदन केले. 

आतापर्यंत मुंबईतील 80 वर्षीय आजीने ही कोरोनावर यशस्वीरित्या मात दिली आहे. तर आता एका महिन्याच्या बाळाने ही कोरोनाला हरवले आहे. गेल्या काही दिवसांपासून सायन रुग्णालयाबाबतच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. रुग्णालयातील कोरोना रुग्णांचे मृतदेह उपचार घेणार्या रुग्णाच्या बाजुला ठेवून उपचार केले जात असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता. 

त्यानंतर, रूग्णालयावर सर्वच स्तरावरुन टीका केली गेली. मात्र, काही दिवसांपूर्वी अशाच एका कोरोना बाळावर सायन रुग्णालयात मेंदूची यशस्वी शस्त्रक्रिया केली गेली. आणि आता हे कोरोना पॉझिटिव्ह बाळ निगेटीव्ह येऊन आपल्या घरी परतले आहे.

one month child beat corona in sion hospital 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

72-Year-Old Paragliding : आजोबांनी Gen-Z लाही लाजवलं ! वयाच्या ७२व्या वर्षी घेतली आकाशात झेप, २४ हजार फूट उंचीवरून पॅराग्लायडिंग, VIDEO VIRAL

IND vs AFG 3rd T2OI: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... श्रेयस अय्यरने Playing XI मध्ये केलाय एक बदल; जाणून घ्या संघ

Crime News: धक्कादायक! चार वर्षीय चिमुकलीसोबत ८५ वर्षीय वृद्धाचे अश्लील कृत्य, डोंबिवलीत संतापाची लाट

Latest Marathi News Update : नागपूरच्या अजनी चौकात ‘आशीर्वाद का दीया’ अभियान; दीपोत्सवाला मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

Kasari Power Protest: गणेशोत्सवात अखंडित विजेसाठी कासारी ग्रामस्थांचे महावितरणला साकडे; पोतराज आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT