मुंबई : अकरावी ऑनलाईन प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी बुधवारीही शिक्षण उपसंचालक कार्यालयात झुंबड उडाली. प्रवेश प्रक्रियेत प्रवेश न मिळालेले, काही कारणास्तव प्रवेश घेता न आलेले, एटीकेटी आणि फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावा, यासाठी शिक्षण उपसंचालकांनी शुक्रवारी (ता. 18) सायंकाळी 5.30 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
प्रवेश अर्ज भरताना झालेल्या तांत्रिक चुका, घरगुती अडचणी, आजारपण आदी कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडलेल्या अनेक विद्यार्थ्यांना मंगळवारपासून (ता. 15) प्रवेश देण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशीच शिक्षण उपसंचालक कार्यालयात प्रवेशासाठी झुंबड उडाली. दुसऱ्या दिवशीही प्रवेशासाठी सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांकडून प्रवेशाची मागणी वाढत चालल्याने अखेर शिक्षण उपसंचालक कार्यालयाने गुरुवारपर्यंत (ता. 17) असलेली मुदत पुन्हा वाढवली आहे. आता विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आणखी एक दिवस मिळाला असून शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.