Cake 
मुंबई

मालाडमध्ये केकमधून ड्रग्सची विक्री; कॉलेजचा विद्यार्थी अटक

याच प्रकरणात आधी तिघांना करण्यात आली होती अटक

विराज भागवत

मुंबई: सुशांत मृत्यू प्रकरणानंतर मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अनेक ठिकाणी छापे मारले जात आहेत. काही दिवसांपूर्वी NCB ने मालाडच्या एका बेकरीवर छापा टाकून ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश केला होती. त्यावेळी तीन तस्करांना अटक करण्यात आली होती. याच प्रकरणात आता आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी या व्यक्तिला अटक करण्यात आली असून तो एका कॉलेजमधील विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, त्या व्यक्तिकडून LSD नावाचे ड्रग्स NCBने ताब्यात घेतले आहेत. (One more held in Mumbai marijuana cake making bakery case informs NCB)

NCB ने 12 जूनला बेकरीत टाकलेल्या छाप्यात एका महिलेसह दोन जणांना अटक केली होती. मुंबई NCB ने दिलेल्या माहितीनुसार, केक तयार करताना त्यात अंमली पदार्थाचा (Weed) वापर करण्यात येत असल्याचे हे देशातील पहिलेच प्रकरण आहे. 830 ग्रॅम Edible Weed Brownie आणि 160 ग्रॅम गांजाचा साठा जप्त करण्यात आला आहे. केकच्या आणि पेस्ट्रीजच्या माध्यमातून नवीन तरुण पिढी अमली पदार्थांचं सेवन करत असल्याचं उघड झालंय. हे धक्कादायक असल्याचे NCBचं म्हणणं आहे.

देशात असं प्रकरण पहिल्यांदाच समोर आलंय, ज्यामध्ये बेकींग केकच्या निर्मितीत अंमली पदार्थांचा वापर केला जात आहे, अशी माहिती मुंबई NCB दिली आहे. दरम्यान, एका 35 वर्षाच्या रिक्षा चालकाला NCB च्या पथकाने जोगेश्वरीतून शनिवारी अटक केली. त्याच्याकडून 3 लाखांचा कोकेनचा साठा NCB ने जप्त केला. रिक्षाचालक मुंबईच्या उच्चभ्रू ठिकाणी अंमली पदार्थांचा सप्लाय करायचा. या प्रकरणातील पुढील तपास सुरु असल्याचं NCB कडून सांगण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Success Suraiya Desai : संसार सांभाळत स्पर्धा परीक्षेत यश; कोल्हापुरची सुरैया देसाईं महिलांमध्ये राज्यात प्रथम

Pune water supply news: पुण्यात १५ टक्के पाणी कपात टाळण्यासाठी गळती रोखण्याचा महापालिकेचा प्रयत्न; समान पाणी पुरवठा योजना व स्मार्ट मीटरवर भर

Mehkar Lonigavli POCSO Case: लोणी गवळी शाळेत तिसरीतील मुलींचा विनयभंग करणारा मास्तर ग्रामस्थांच्या ताब्यातून पोलिसांच्या स्वाधीन; जिल्ह्यात संतापाची लाट

Gold Price: अमेरिकेतलं १२९ टन सोनं माघारी आणलंच नाही..! एका निर्णयाने फ्रान्सची सेंट्रल बँक तोट्यातून थेट नफ्यात

Latest Marathi News Live Update: संघाचे कार्य संघ स्वयंसेवकांच्या श्रमाने सुरु- मोहन भागवत

SCROLL FOR NEXT