मुंबई

मुंबई कुणाच्या निशाण्यावर? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळून कार्बाईनसह फिरणाऱ्या एका संशयीताला अटक

अनिश पाटील

मुंबई, ता.01ः नववर्षाच्या आगमनासाठी सर्व मुंबईकर आतूर झाले असताना वांद्रे येथे कार्बाईनसह फिरणाऱ्या एका संशयीताला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली आणि आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळून पकडण्यात आलंय. हा आरोपी मध्यप्रदेशातील रहिवासी असून त्याच्याकडून कार्बाईन, मॅगझीन, पिस्तुल व जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. प्रल्हाद ऊर्फ प्रवीण वेचन बोर्डे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. यावरून मुंबई आता कुणाच्या निशाण्यावर आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. 

आरोपी तेथे शेती करतो असे त्याने चौकशीत सांगितले आहे. याप्रकरणी निर्मल नगर पोलिस ठाण्यात भादंवि कलम 325 सह हत्यारबंदी कायदा 37 (1)(अ) सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 137 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला संशयीत व्यक्ती शस्त्रासह येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-8 च्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचला होता. सायंकाळी सातच्या सुमारास पोलिसांनी वांद्रे येथील इंदिरा नगर झोपडपट्टी जवळील फलाट परिसरातून तेथे आलेल्या संशयीताला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवची उत्तरे दिली. त्याच्या झडतीत त्याच्याकडे  एक कार्बाईन, दोन मॅगझीन, तीन पिस्तुल व 15 जीवंत काडतुसे सापडली असून पोलिसांनी शस्त्रसाठा जप्त केला आहे. आरोपी या शस्त्र कशासाठी घेऊन आला होता याबाबत आता पोलिस अधिक तपास करतायत.

one person detained by mumbai police carrying carbine gun and other weapons

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anurag Thakur : जेव्हा देशाला गरज असते तेव्हा गांधी दांड्या मारतात; अनुराग ठाकूर यांची टीका

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

Mumbai News : आरक्षण वर्गीकरणाच्या न्या. बदर समितीला सहा महिन्याची मुदतवाढ

Pune News : प्रमुख जिल्हा न्यायाधीश मैदानात; दंड भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना केले सहकार्याचे आवाहन

Vishwas Pathak : जीएसटी कमी झाल्याने नागरिक आनंदी; भाजप प्रवक्ते विश्‍वास पाठक

SCROLL FOR NEXT