मुंबई

तब्बल चार तासांनी संपलं थरारनाट्य, आत्महत्येच्या प्रयत्नात होता मुंबईतील पोलिस...

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुंबईतील दादर भागात आज एक धक्कादायक घटना घडली. दादरमधील शिंदेवाडी भागात एका पोलिसांने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय. या भागातील एका इमारतीच्या गच्चीत सदर पोलिस गेलेत. त्यानंतर त्यांनी गच्चीचा कठडा ओलांडून ते एका खिडकीच्या निमुळत्या कठड्यावर उतरलेत. त्या कठड्यावर सदर पोलिस कर्मचारी बराच वेळ चकरा मारत होते. या सर्व प्रकारामुळे आज सकाळी या भागात मोठी खळबळ माजली होती. 

नक्की घडलं काय ?

सदर घटना आज सकाळी दहा ते अकरा वाजेदरम्यन घडली. १० - ११ वाजताच्या सुमारास हे २९ वर्षीय पोलिस कर्मचारी दादरमधील शिंदेवाडी भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवर असलेल्या एका चार मजली इमारतीच्या गच्चीवर गेले. सिव्हिल ड्रेसमधील या पोलिसाला इथे का आलात अशी काहींनी विचारणाही केल्याची माहिती मिळते. मात्र कुणालातरी भेटायला आलोय असं उत्तर यानं दिलं.

यानंतर संबंधित पोलिस इमारतीच्या गच्चीवर गेले.काही काळ या पोलिस इसमाने गच्चीवर फेऱ्या मारल्यात. ते काही हातवारे करत होते आणि रडतही होते असं टीव्ही  रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं. यानंतर गच्चीचा कठडा ओलांडून सदर पोलिस कर्मचारी एका खिडकीच्या अत्यंत निमुळत्या कठड्यावर उतरले. मुंबईतील या भागातील अनेक इमारती कंटेन्टमेंट झोनमध्ये असल्याने गच्चीत आणि त्यानंतर कठड्यावर सदर इसम फेऱ्या कशाला मारतोय असा प्रश्न आसपासच्या इमारतीतील नागरिकांना पडला. मिळालेल्या माहितीप्रमाणे आसपासच्या इमारतीमधील नागरिकांनी पोलिस आणि अग्निशमन दलाला फोन करून घटनास्थळी पाचारण केलं. 

दरम्यान तब्बल चार तासांनंतर या पोलिसांची समजूत काढून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यात पोलिस आणि अग्निशमन दलाला यश आलं. सदर पोलिसांची समजूत काढल्यानंतर ही व्यक्ती गच्चीच्या आतील भागात परत आली आणि सर्वानीच सुटकेचा निश्वास टाकला. पोलिसांनी पुढाकार घेत त्याला शांत करत बिल्डिंगखाली आणलं.

डोक्यावरील केस कमी होत चालले असतानाच लग्न जमत नाही, त्यातच दोन मुलींनी लग्नाला नकार दिल्याने, मानसिक नैराश्येत आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने दादर येथील इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी वरिष्ट पोलिस अधिकाऱ्यांनी पोलिसाची समजुत काढत त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केलंय.

गेल्या अनेक दिवसांपासुन सदर पोलिस कर्मचारी मानसिक नैराश्यात होते. डोक्यावरील केस गळत असल्याने त्याना टक्कल पडण्यास सुरुवात झाली होती. त्यातच त्यांचे लग्न जमत नव्हते.अशात दोन मुलीनी त्यांना लग्नासाठी नकार दिला होता. तसेच गेल्या काही दिवसांपासून सुट्टी मिळत नसल्यामुळे ते मानसिक तणावाखाली होते

one of the police thought of ending his life at dadar shindewadi area

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT